तर जळगाव जिल्ह्यात 11 ठिकाणी स्व-बळावर निवडणूका लढवणार : माजी नगरसेवक जगन सोनवणे


भुसावळ (18 ऑक्टोबर 2024) : भुसावळ विधानसभेची जागा महाविकास आघाडीने पीआरपीला न सोडल्यास आपण जिल्ह्यातील 11 जागांवर स्वबळावर उमेदवार उभे करू, असा इशारा ऑल इंडिया संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष व पीआरपी प्रदेश उपाध्यक्ष जगन सोनवणे यांनी शुक्रवारी शहरातील पत्रकार परिषदेत केला. यावेळी पंचायत समितीच्या माजी सदस्य पुष्पा जगन सोनवणे उपस्थित होत्या.

तर सभा गाजवणार : पुष्पा सोनवणे
लोकसभेत राष्ट्रवादी आणि काँग्रेस व महाविकास आघाडीचा प्रचार संविधानवादी नेते व राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे यांनी केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस व महाविकास आघाडी पती जगन सोनवणे यांना तिकीट देणार नाही तर जळगाव जिल्ह्यात व खान्देशात मुलुख मैदानी तोफ, संविधानवादी नेते आघाडीविरुद्ध सभा गाजवतील, असे पंचायत समितीच्या सदस्य पुष्पा सोनवणे म्हणाल्या.


पत्रकार परिषद शहरताील संविधान भवन, छत्रपती-भीमालय या ठिकाणी शुक्रवारी झाली. यावेळी विविध 10 संघटनांचे पदाधिकारी तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व इच्छुक उमेदवार उपस्थित होते.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !