वुमन ऑफ द मंथ व मॅन ऑफ द मंथ पुरस्काराने कर्मचार्यांचा सन्मान
भुसावळ (18 ऑक्टोबर 2024) : भुसावळ डीआरएम ईती पाण्डेय यांच्या हस्ते 30 कर्मचार्यांना वुमन ऑफ द मंथ आणि मॅन ऑफ द मंथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार कर्मचार्यांच्या उत्कृष्टतेसाठी देण्यात आला. कर्मचार्यांच्या समर्पण आणि मेहनतीला या पुरस्काराच्या माध्यमातून सन्मानित करण्यात आले.
विविध श्रेणीतील कर्मचार्यांचा सन्मान
पुरस्कार प्राप्त करणार्या कर्मचार्यांमध्ये विविध श्रेणीतील कर्मचारी समाविष्ट होते. मंडल रेल प्रबंधकांनी पुरस्कार विजेत्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांना सतर्क राहण्यास व त्यांच्या कर्तव्यांचे पालन अत्यंत समर्पणाने करण्याबद्दल प्रशंसा केली. भुसावळ विभागात 15 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत स्वच्छता ही सेवा आणि 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत स्वच्छता पखवाडा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या दोन्ही कार्यक्रमांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.ज्यामध्ये रेल्वे कर्मचारी, शाळेतील विद्यार्थी आणि बीटीसी प्रशिक्षण घेत असलेले प्रशिक्षक सहभागी झाले. या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करणार्या सहभागींना पुरस्कार देण्यात आले. स्टेशन प्रबंधक, मुख्य आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य युनिटच्या कर्मचार्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. सूत्रसंचालन वी.एस.वडनेरे यांनी केले.

