भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये शास्त्रीय वाद्य वादन स्पर्धा उत्साहात
भुसावळ (18 ऑक्टोबर 2024) : शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 15 रोजी शास्त्रीय वाद्य वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ताप्ती पब्लिक स्कूलमधील पाचवी ते दहावीपर्यंतच्या 20 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला व आपली कला सादर केली. द्वीपप्रज्वलन प्रिंसीपल नीना कटलर यांनी केले. प्रसंगी उपप्राचार्या श्रद्धाली घुले, मनप्रीत कौर उपस्थित होत्या. स्पर्धेचे परीक्षक म्हणून संगीत क्षेत्रातील शंभू गोडबोले होते.
स्पर्धेवेळी प्रिंसीपल नीना कटलर यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेच्या निकाल ताल वाद्यात- रुद्र ललित झांबरे (प्रथम), चिन्मय दिनकर राणे (द्वितीय), चिन्मय अशोक तायडे (तृतीय) तर सूर वाद्यात प्रचिती डोंगळे (प्रथम), भूमी पाटील (द्वितीय), चिन्मय अशोक तायडे (तृतीय) आला. स्पर्धेकरीता संगीत विभाग प्रमुख महेंद्र सूर्यवंशी, संगीत शिक्षिका प्रीती देशपांडे, अर्जुन सनस, नितीन अडकमोल व इतर शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले.

