चोरट्याची अजब तर्‍हा : केवळ लांबवायचा स्वीप्ट डिझायनर : एमआयडीसी पोलिसांनी आवळल्या मुसक्या


जळगाव (20 ऑक्टोबर 2024) : केवळ स्वीप्ट गाडीला टार्गेट करून ती लांबवार्‍या एका सराईत गुन्हेगाराबाला छत्रपती संभाजीनगरातून एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याकडून चोरीची कार जप्त केली. शेख दाऊद शेख मंजुर (रा.सुंदरवाडी संभाजीनगर) असे संशयिताचे नाव आहे. ंशयीताविरोधात राज्यात विविध जिल्ह्यात कार चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

जळगावातून लांबवली कार
दीपक जगदीश खडके यांची (क्र.एम.एच.02 सी.डब्लू. 0906) ही कार शहरातील सदगुरुनगर येथील घरासमोरुन चोरी झाली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. कॉन्स्टेबल राहुल रगडे, विशाल कोळी, राहुल घेटे यांनी तांत्रीक पद्धतीने तपास करुन सदर कार ही संभाजीनगरच्या दिशेने गेल्याचे दिसून आल्यानंतर एमआयडीसी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथके संभाजीनगरच्या दिशेने रवाना करण्यात आली.


दाऊद याच्यावर राज्यासह भारतात अनेक शहरामध्ये कार चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. गोपनीय माहितीवरुन शेख दाऊद याला संभाजीनगरातील सुंदरवाडी येथील त्याच्या राहत्या घरातून पथकाने ताब्यात घेतले. त्याचेकडे एक स्वीफ्ट डीझायर कार (क्र.एम.एच.15 जी.ए.4887) ही मिळून आली. ही कार परभणी येथून चोरी केल्याची कबुली त्याने दिली. या कारसंदर्भात नानलपेठ पोलीस स्टेशन परभणी येथे गुन्हा दाखल असल्याची माहीती पथकाला मिळाली. संशयिताने दीपक जगदीश खडके यांच्या मालकीच्या कार चोरीची काहीही माहिती दिली नाही.

यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, हवालदार दत्तात्रय बडगुजर, किशोर पाटील, विकास सातदीवे, योगेश बारी, राहुल रगडे, विशाल कोळी, राहुल घेटे यांनी केली. तपास हवालदार दत्तात्रय बडगुजर करीत आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !