विधानसभा निवडणूक : भुसावळात 18 तर रावेरात 28 अर्जांची विक्री


भुसावळ (23 ऑक्टोबर 2024) : भुसावळ विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याने मंगळवार, 22 रोजी अर्ज सादर करण्याच्या पहिल्या दिवशी भुसावळात 18 तर रावेरात 28 व मुक्ताईनगरात 16 अर्जांची विक्री झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, गुरुवारी असलेला गुरुपुष्पामृताचा योग व 29 रोजी धनत्रयोदशीचा मुहूर्त पाहून दावेदारांकडून अर्ज दाखल करण्यात येतील, अशी दाट शक्यता आहे.

भुसावळात 18 अर्जांची विक्री
भुसावळ विधानसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी 11 इच्छूकांनी 18 अर्ज खरेदी केले. उमेदवारी दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. अर्ज विक्रीसाठी प्रांताधिकारी कार्यालयात स्वतंत्र टेबल असून प्रति अर्ज शंभर रुपये प्रमाणे आकारले जात आहेत. मंगळवारी 11 इच्छूकांनी एकूण 18 अर्ज खरेदी केल तर दोन इच्छूकांनी प्रत्येकी चार अर्ज खरेदी केले. उमेदवारी अर्ज घेणार्‍यांमध्ये विजय सुकदेव सावळे, रवींद्र बळीराम सपकाळे, सोनल रवींद्र सपकाळे, प्रशांत मनोहर तायडे, सचिन कुंदन वानखेडे, अजय जीवराम इंगळे, दिलीप कौतीक सुरवाडे यांनी प्रत्येकी एक अर्ज घेतला तर प्रीती तोरण महाजन व लक्ष्मण कौतीक सोयंके यांनी प्रत्येकी चार तसेच प्रवीण नाना सुरवाडे यांनी दोन अर्ज असे 11 जणांनी 18 अर्ज घेतले.

रावेर विधानसभेसाठी 28 अर्जाची विक्री
रावेर : विधानसभा मतदारसंघासाठी मंगळवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला तर दहा जणांनी 28 अर्ज विकत घेतल्याचे प्रशासनाने सांगितले. अर्ज विकत घेणार्‍यांमध्ये डी.डी.वाणी, संजय अर्जुन चौधरी, रोशन सुभान तडवी, सकीला मेहमूद तडवी, शेख कुर्बान शेख करीम, दारा मोहम्मद नूरमोहम्मद तडवी, रशीद शित्रु तडवी, प्रशांत शरदराव बोरकर, धनंजय शिरीष चौधरी या दहा जणांनी 28 अर्ज उमेदवारी अर्ज घेतले आहेत.

मुक्ताईनगर विधानसभेसाठी 16 अर्जाची विक्री
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर विधानसभेसाठी पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नसलातरी 16 अर्जांची मात्र विक्री झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मुक्ताईनगरात महायुतीकडून आमदार चंद्रकांत पाटील तर महाविकास आघाडीकडून अ‍ॅड.रोहिणी खडसे या उमेदवार आहेत. मातब्बरांकडून मुहूर्त पाहून अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !