वरणगावात गाड्यांना थांब्याबाबत पाठपुरावा करणार ! : भुसावळ रेल्वेच्या डीआरएम ईती पाण्डेय यांचे भेटीप्रसंगी आश्वासन


वरणगाव (23 ऑक्टोबर 2024) : वरणगाव रेल्वे स्थानकावर कोरोना काळापूर्वी अप-डाऊन सुरत -अमरावती एक्स्प्रेससह पॅसेंजर गाड्यांना थांबा होता मात्र कोरोनानंतर या गाड्यांना थांबा बंद करण्यात आल्याने पूर्ववत थांबा सुरू करण्याच्या मागणीसाठी नुकतेच आंदोलन करण्यात आले. डीआरएम ईती पाण्डे यांनी या पार्श्वभूमीवर शहराला भेट देत समस्या जाणून घेतल्या. रणगाव येथे भेट दिली सिद्धेश्वर नगर येथील जाणार्‍या रेल्वे पुलाची पूर्ण पाहणे केली याबाबतीत तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे आश्वासन डीआरएम इती पांडे यांनी दिले रेल्वे गाड्यांना थांब्याबाबत जीएमकडे पत्रव्यवहार करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

या मागण्यांसाठी आंदोलन
शिर्डी साईनगर, अजमेर, अमरावती-पुणे, अमरावती-नाशिक मेमू गाड्यांच्या फेर्‍या वाढवण्यात याव्या तसेच सिद्धेश्वर नगरातील भूमिगत रेल्वे पूल बोदवड रोडवरील श्री नागेश्वर मंदिराजवळील उड्डाणपूल, रेल्वे स्टेशनवर आरक्षण खिडकी, फुलगावजवळील रेल्वे बोगदा तयार करावा आदी मागण्यांसाठी बुधवार, 16 ऑक्टोबर रोजी वरणगावात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत डीआरएम ईती पाण्डेय यांनी मंगळवारी भेट दिली. माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी पुन्हा मागण्यांबाबत चर्चा करीत सिद्धेश्वर नगर जाण्यासाठी अंडर बायपास अथवा उड्डाणपूल करावा तसेच बोदवड येथे नागेश्वर मंदिराजवळ उड्डाणपूल करण्याची मागणी केली व मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला. यावेळी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नाना चौधरी, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, नगराध्यक्ष शेख अखलाक, मिलिंद भैसे, चौधरी डॉक्टर, नाना फामने, कामगार नेते मिलिंद मेढे, शामराव धनगर, कृष्णा महाजन, गोलू राणे, रमेश पालवे, योगेश माळी, प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष अजमल खान, फजल शेख उपस्थित होते.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !