मुंबई एक्स्प्रेसमध्ये चढणार्या महिलेची अडीच लाख लांबवले : सतर्क यंत्रणामुळे अहमदनगरच्या तिघांना बेड्या
Woman boarding Mumbai Express robbed of Rs 2.5 lakh : Three from Ahmednagar held in custody due to alert system चाळीसगाव (9 डिसेंबर 2024) : चाळीसगावातील विवाहितेच्या पर्समधून अडीच लाखांची रोकड भामट्यांनी रविवार, 8 डिसेंबर रोजी लांबवली होती. धुळे-मुंबई एक्स्प्रेसमध्ये विवाहिता चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी चोरी केली मात्र सतर्क चाळीसगाव आरपीएफसह लोहमार्ग पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातील त्रिकूटाला बेड्या ठोकल्या असून त्यातील एक अल्पवयीन आहे.
या संशयीतांना अटक
अर्जुन उर्फ गोल्ट्या कानिफनाथ भोसले (25, रा.मारोती मंदिराजवळ, धारणगाव ता.कोपरगाव, जि.अहमदनगर), अक्षय बाळासाहेब नन्नावरे (23, रा.मारोती मंदिराजवळ धारणगाव, ता.कोपरगाव, जि.अहमदनगर) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत तर त्यांचा अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेण्यात आले आहे. संशयीतांकडून दोन लाख 19 हजाांची रोकड जप्त करण्यात आली.

असे आहे चोरी प्रकरण
चाळीसगावातील विवाहिता शीतल कैलास पाखले यांना मुंबई जायचे असल्याने त्या 11012 एक्स्प्रेसच्या कोच डी. 3 मध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी महिलेच्या पर्समधून अडीच लाखांच्या रोकडसह महिलेच्या पतीचे आधार कार्ड, पॅन कार्ड व मोटारसायकलची चाबी लांबवली. 8 रोजी हा प्रकार घडल्यानंतर चाळीसगाव लोहमार्ग ठाण्यात नोंद करण्यात आली.
यांनी केली कारवाई
लोहमार्गच्या पोलीस अधीक्षक स्वाती भोर, मनमाड लोहमार्ग उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यकांत बांगर, प्रभारी अधिकारी सुरेश भाले, रेल्वे सुरक्षा बलाचे विभागीय आयुक्त चित्रेश जोशी, सहा.सुरक्षा आयुक्त राजेशकुमार केसरी, चाळीसगाव आरपीएफ निरीक्षक अतुल टोके यांच्या मार्गदर्शनाखाली फुटेज चेक करून व गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार लोहमार्ग पोलीस ठाणे चाळीसगावचे पोलीस उपनिरीक्षक सुधाकर मोहिते, श्रेणी पीएसआय अनंत रेणुके, पंकज पाटील, मोहसिन अली सय्यद, फरीद तडवी तसेच रेल्वे सुरक्षा बल चाळीसगाव येथील उपनिरीक्षक पी.डी.पाटील, किशोर चौधरी, आरक्षक रेहान अहमद, गोविंद राठोड यांच्या मदतीने आरोपींना अटक करण्यात आली.

