जळगावात प्राणप्रतिष्ठा महोत्सव : भुसावळकडून जळगाव जाणार्‍या अवजड वाहनांना 17 डिसेंबरपर्यंत बंदी

जामनेरमार्गे अवजड वाहनांना जाण्या-येण्याचा पर्याय : धुळ्याकडील वाहने एरंडोलमार्गे वळवली


Alternative for heavy vehicles to travel via Jamner : Vehicles from Dhule diverted via Erandol भुसावळ (10 डिसेंबर 2024) :जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील भुसावळ रोडवरील दूरदर्शन टॉवरजवळ असलेल्या श्री स्वामीनारायण मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सव 10 ते 17 डिसेंबरपर्यंत असल्याने या मार्गावरून जाणार्‍या-येणार्‍या अवजड वाहनांना पोलीस प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग सूचवण्यात आला असून त्याबाबतचे आदेश जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी काढले आहेत.

जळगाव-धुळ्याकडे जाणार्‍या वाहनांना जामनेर मार्गाचा पर्याय
जळगावातील दूरदर्शन टॉवरजवळ असलेल्या श्री स्वामीनारायण मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे मंगळवार, 10 ते 17 डिसेंबरपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. भाविकांची मोठ्या प्रमाणातील गर्दी पाहता व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी याठिकाणाहून होणारी अवजड वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. भुसावळकडून धुळ्याकडे जाणार्‍या वाहनांसाठी नाहाटा कॉलेज, जामनेर, नेरी, वावडदा, म्हसावद, एरंडोलमार्गे पर्याय सूचवण्यात आला आहे तर भुसावळकडून जळगावकडे जाणार्‍या वाहनांसाठी नाहाटा कॉलेज, जामनेर, नेरी, अजिंठा चौक मार्गे पर्याय सूचवण्यात आला आहे.

भुसावळ येण्यासाठी अजिंठा चौकाचा पर्याय
जळगाव शहरातून भुसावळकडे जाणार्‍या वाहनांसाठी अजिंठा चौक, नेरी, जामनेरमार्गे तसेच धूळ्याकडून मुक्ताईनगर व संभाजीनगरकडे जाणार्‍या वाहनांसाठी एरंडोल, म्हसावद, वावडदा, नेरी, जामनेरमार्गे पर्याय सूचवण्यात आला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !