जळगाव मनपातील लाच प्रकरण : सहायक अभियंता मनोज वन्नेरे कोठडीत : सहा.संचालकांची एसीबीकडून चौकशी


Jalgaon Municipal Corporation bribery case: Assistant Engineer Manoj Vannere in custody: Sixth Director questioned by ACB जळगाव (11 डिसेंबर 2024) : 15 हजारांची लाच स्वीकारताना जळगाव मनपातील सहाय्यक अभियंता मनोज वन्नेरे यास जळगाव एसीबीने अटक केली होती. संशयीताला मंगळवारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, लाच प्रकरणात नगररचना शाखेचे सहायक संचालक दिगेश तायडे यांची एसीबीकडे सलग चार तास चौकशी करण्यात आली तर मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरेंची लाच प्रकरणात आज चौकशी होण्याची शक्यता आहे.

असे आहे लाच प्रकरण
महानगरपालिकेच्या नगररचना विभागात सहाय्यक अभियंता असलेल्या मन्नेरे याने तक्रारदाराकडून तीन खोल्यांचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी 15 लाच मागितल्यानंतर सापळा रचून त्यांना सोमवारी शहरातील व. वा. वाचनालयाच्या जवळील राज्य शासनाचे नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभाग सहायक संचालक, नगररचना, जळगाव शाखा यांच्या कार्यालयातून पकडण्यात आले होते. या कारवाईने लाचखोर प्रचंड हादरले होते.

नऊ मुद्यांवर पीआरआर मंजूर
आरोपी वन्नेरे यास मंगळवारी न्यायालयात हजर केल्यानंतर नऊ मुद्यांवर पीसीआर मागण्यात आला. तक्रारदाराकडे वन्नेरेने जुन्या दोन प्रकरणातही 15 हजार रुपयांच्या लाच मागितली शिवाय मागील किती कालावधीपासून भ्रष्टाचार करून लाच स्वीकारत आहे याचा तपास करायचा आहे शिवाय वन्नेरेने लाच मागणी करताना महापालिका आयुक्त व नगररचना विभागाचे सहायक संचालक यांच्यासाठी लाचेची मागणी केल्याने त्याचा तपास करणे बाकी आहे. न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी मंजूर केली. आरोपीतर्फे अ‍ॅड. आर.के.पाटील तर सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी बाजू मांडली. तपास एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर करीत आहेत.

सहाय्यक संचालकांची चौकशी
महापालिकेचे नगररचना सहायक संचालक दिगेश तायडेंसाठी लाच मागितल्याचे आरोपीने एसीबीला सांगितल्याने मंगळवारी त्यांना चौकशीसाठी कार्यालयात बोलावण्यात आले होते. त्यांची दुपारी उदोन वाजेपासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कार्यालयात चौकशी करण्यात आली मात्र त्यांनी काही विशेष माहिती दिलेली नसल्याचे सांगण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !