दारु पिण्यास पैसे न दिल्याने लाकडी बॅटने मारहाण
Man beaten with wooden bat for not paying for alcohol जळगाव (11 डिसेंबर 2024) : दारु पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून नशेतील संशयिताने शिवीगाळ करत लाकडी बॅटने मारहाण केली. त्यानंतर झटापट करत मारहाण केली. यात डोळ्याच्या खाली व डोक्याला मुकार मार लागला.
तक्रारदाराच्या खिशातून मोबाईल पडून नुकसान झाले. ही घटना रविवार, 8 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मंगलपुरी भागात हनुमान मंदीराजवळ घडली. या प्रकरणी नरेश पांडुरंग पवार (वय 42,रा. रामेश्वर कॉलनी) यांच्या तक्रारीनुसार रवी जाबर (रा. मंगलपुरी रामेश्वर कॉलनी) याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोना पंकज पाटील हे करीत आहेत.


