कत्तलीच्या उद्देशाने गुरांची वाहतूक : शनिपेठ पोलिसांची मोठी कारवाई


जळगाव (12 डिसेंबर 2024) : कत्तल करण्याच्या उद्देशाने खरेदी करुन बैलांची निर्दयपणे वाहनातून वाहतुक करणार्‍या वाहनावर शनिपेठ पोलिसांनी कारवाई केली. मंगळवार,10 रोजी सकाळी 8.15 वाजेच्या सुमारास भिलपुरा चौकात तपासणी दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. या वाहनात सुमारे 50 हजार किमतीचे दोन बैल होते. पोलिसांनी वाहनासह सुमारे 5 लाख 50 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला.

शेख जमील शेख अब्दुल रहमान कसाई ( वय 25, चालक रा. चोपडा) याने पिकअप वाहन ( क्रमांक एमएच 19 सीवाय 0966) मध्ये अवैध रित्या दोन बैल कोंबले . चालकाकडे वैद्यकीय अधिकार्‍याचे प्रमाणपत्र आढळुन आले नाही. तसेच गोवंश जातीचे बैलांना वाहनामध्ये कोणतीही सुविधा ने देता कोंबुन वाहतुक करत असल्याचा प्रकार निदर्शनास आला. पोलिसांनी या बैलांची सुटका करुन त्यांनी गोशाळेत रवानगी केली. वाहन जप्त केले. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास पोहेकॉ योगेश माळी हे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !