भरधाव डंपरने उडवले : जळगावातील तरुणाचा मृत्यू


A young man from Jalgaon died after being hit by a speeding dumper जळगाव (12 डिसेंबर 2024) : घरुन शहरात येत असताना मागवून भरधाव वेगातील डंपरने दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातामध्ये दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. बुधवार, 11 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना एमआयडीसीतील आरएल चौफुलीवर घडली. आसिफ कुरेशी हाजी शौकत कुरेशी (40, मुळ रा.युपी ह.मु.सुप्रीम कॉलनी आयशानगर) असे मृताचे नाव आहे.

असा घडला अपघात
नातेवाईकांच्या माहितीनुसार आसहसफ कुरेशी हे कुटुंबासह आयशानगर येथे वास्तव्यास होते. ते वॉलपेपर चे काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. बुधवारी दुपारी कामानिमित्त ते त्यांच्या मालकीची दुचाकी (क्रमांक एम.एच.19 डी.सी.1751) ने शहरात येण्यास निघाले. आरएल चौफुलीजवळुन ते जात असताना मागवून भरधाव वेगातील डंपर (क्रमांक एम.एच.19 सी.एक्स.4940) ने दुचाकीला धडक दिली. या दुर्घटनेत आसीफ कुरेशी हे दुचाकीवरुन कोसळुन त्यांच्या डोक्याला मार लागुन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

आयशानगरातील नागरिक या मार्गावरून जात असताना त्यांना अपघात दिसला. त्यांनी घटनास्थळी जावून पाहिले असता मृत व्यक्ती ओळखु आला नाही. मात्र दुचाकीची ओळख पटल्याने मृत हे आसिफ खाटीक असल्याचे लक्षात आले. तातडीने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले. यावेळी आयशानगरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

मृत आसीफ हे विवाहित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार लहान मुली, एक मुलगा असा परिवार आहे. त्यांची आई तसेच त्यांचा एक भाऊ हे मुंबई येथे वास्तव्य करतात. त्यांना स्थानिक नागरिकांनी माहिती दिली. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात जावून माहिती घेतली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !