बोरखेडा अनधिकृत वीज वापरकर्त्यांविरूध्द धडक मोहिम : 35 कनेक्शन कापले
Crackdown on unauthorized electricity users in Borkheda : 35 connections cut off यावल (18 डिसेंबर 2024) : यावल तालुक्यातील बोरखेडा येथे मंगळवारी थकीत वीज बिल वसुली व अनधिकृत वीज वापरकर्त्याविरूध्द धडक मोहिम राबवण्यात आली. यात वीज बिल अदा न केलेल्यांसह अधिकृत वीज वापरणार्या 35 जणांचे कनेक्शन कापण्यात आले व ग्रामस्थांना अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
कारवाईने गावात उडाली खळबळ
राज्य विद्युत वितरण कंपनीचे सांगवी बुद्रुक कक्षा अंतर्गत येणार्या बोरखेडा गावामध्ये महावितरणचे सहाय्यक अभियंता आकाश नेहेते यांच्या नेतृत्वाखाली थकीत वीज बिल वसुली तसेच अनधिकृत वीज जोडणी खंडित करण्यासाठी धडक मोहिम राबवण्यात आली. गावातील अनधिकृत जोडणी असलेल्या ग्रामस्थांना लवकरात लवकर नवीन वीज जोडणी घेण्यासाठी आवाहन करण्यात आले. महावितरणच्या थकबाकीदारांसाठी अभय योजनेचा लाभार्थी होण्यासाठी आवाहन करीत योजनेचा लाभासाठी पुढाकार घेण्यात आला. गावात 35 जणांचे कनेक्शन तुर्त कापण्यात आले. नागरीकांनी वीज चोरी करू नये, वीज चोरी करतांना कोणी आढळल्यास त्यांच्याविरूध्द वीज चोरीचा गुन्हा दाखल केला जाईल, अशा सुचना करण्यात आल्या.



