जळगावात पुन्हा अपघात : बालकाला चिरडणार्‍या डंपरला जमावाने पेटवले


Another accident in Jalgaon: A mob set fire to the dumper that crushed a child जळगाव (25 डिसेंबर 2024)  :शहरात अवजड वाहतुकीमुळे होणारे अपघात पाहता नुकतीच नियमावली जारी करण्यात आली मात्र त्यानंतरही अपघातांचे सत्र थांबलेले नाही. कालिकामाता चौकात भरधाव डंपरने धडक दिल्याने नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला असून बालकासोबतच दोघे जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवार, 25 डिसेंबर रोजी रात्री 7.15 वाजता घडला. दरम्यान, संतप्त जमावाने यावेळी डंपर पेटवून दिल्याने तणावपूर्व वातावरण निर्माण झाले आहे. योजस धीरज बर्‍हाटे (9, रा.लीला पार्क, अयोध्या नगर) असे मयत चिमुकल्याचे नाव आहे.

काय घडले नेमके ?
योजेस हा चिमुकला आई-वडील आणि बहिण भक्ती धीरज बर्‍हाटे (13) यांच्यासोबत अयोध्या नगरातील लीला पार्क परिसरामध्ये वास्तव्यास होता. बुधवार, 25 डिसेंबर रोजी भादली येथील मामा योगेश हरी बेंडाळे हे त्यांच्या घरी आले होते. संध्याकाळी जेवणाचे पार्सल घेण्यासाठी योगेश बेंडाळे हे सायंकाळी 7.15 वाजेच्या सुमारास भाची भक्ती आणि भाचा योजस त्याच्यासोबत दुचाकीने कालिंका माता चौकातून जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत योजेस बर्‍हाटे हा चिमुकला जागीच ठार झाला तर बहिण भक्ती आणि मामा योगेश बेंडाळे हे किरकोळ जखमी झाले.

संतप्त जमावाने डंपर पेटवला
अपघाताची माहिती मिळताच अजिंठा चौकात उभा असलेला डंपर संतप्त नागरिकांनी पेटवून दिला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एमआयडीसी पोलिसांना तसेच स्थानिक पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी धाव घेत जमाव पांगवला तसेच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !