जळगावच्या एमआयडीसीतील चटई कंपनीतील आगीवर सहा तासांनी नियंत्रण
जिल्हाधिकार्यांकडून पाहणी : जिल्हाभरातून आले अग्निशमन बंब
Fire at carpet company in Jalgaon’s MIDC brought under control after six hours जळगाव (30 डिसेंबर 2024) : जळगाव शहरातील औद्योगिक वसाहतीमधील सिद्धिविनायक इंडस्ट्रियल डी.66/1 येथील प्लास्टिक चटई कंपनी व सूर्यफूल बियाणे असलेल्या कंपनीला रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी पाचारण केले. घटनास्थळी पोहोचताच आगेवर फोम व पाण्याचा मारा करत अग्निशमन कर्मचार्यांनी आग आटोक्यात आणली. जळगाव शहर महानगरपालिका जळगाव यांच्या तीन गाड्या, जामनेर नगरपालिका ,भुसावळ नगरपालिका, वरणगाव नगरपालिका, वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी, भुसावळ ऑडनस फॅक्टरी व जैन इरिगेशन दोन गाड्याच्या साह्याने (फायर फायटर)आगीवर नियंत्रण मिळवणे लवकर शक्य झाले. पहाटे पाच वाजेपर्यंत अग्निशमन कार्य सुरू होते. या आगीत कोणतीही जिवीवतहानी झाली नाही.
जिल्हाधिकार्यांची धाव
जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे, उपअधीक्षक (गृह) संदीप गावीत, अग्नीशमन अधिकारी मनपा शशिकांत बारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत घटनेची माहिती घेतली व कर्मचार्यांना सुचना केल्या. जिल्हाधिकारी यांनी स्वतः पाहणी करून सुप्रीम कंपनीच्या क्रेनद्वारे कंपनीच्या दोन्ही बाजूच्या भिंती पाडून आतील सूर्यफुल बियाणे आणि चटईसाठी लागणार्या प्लास्टिकच्या कच्च्या मालाला व ग्रँन्यूअलला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मार्गदर्शन केले.
यांनी घेतले परिश्रम
आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचारी शशिकांत बारी, अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे, वाहन चालक निवांत इंगळे, वाहन चालक देविदास सुरवाडे, वाहन चालक नंदकिशोर खडके, वाहन चालक नासीर अली, वाहन चालक संजय भोईटे, भारत बारी, विजय पाटील, पन्नालाल सोनवणे, तेजस जोशी, मनोज तिरवड, हर्ष शिंदे, नितीन ससाने, निलेश सुर्वे, गिरीश खडके, सरदार पाटील, योगेश कोल्हे आदींनी आग विझवण्यासाठी सहकार्य केले.


