भुसावळातील भोळे महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर


भुसावळ (30 डिसेंबर 2024) :  दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर ‘युथ फॉर भारत व युथ फॉर डिजिटल लिटरसी’ 29 डिसेंबर ते शनिवार, 4 जानेवारी 2025 पर्यंत राजोरा, ता.यावल येथे आयोजित करण्यात आले आहे. उद्घाटन राजोरे सरपंच पुष्पा गिरीधर पाटील यांनी केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी केले.

यांची होती उपस्थिती
गावातील पोलीस पाटील मुक्ताताई गोसावी, मुख्याध्यापिका रंजना विठ्ठल सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य चेतन पाटील, सुवर्णा महाजन, रोहिणी बोरोले, सुनंदा पाटील उपस्थित होत्या. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.राजेश भागवत ढाके, प्रा.डॉ.जगदीश बन्सीलाल चव्हाण, महिला कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.माधुरी अशोक पाटील, प्रा.धनश्री पाटील यांनी केले. कार्यक्रमास प्रा.डॉ.अनिल सावळे, शिक्षकेतर कर्मचारी प्रकाश चौधरी, रा.से.यो.चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.



विशेष प्रशिक्षक व माजी स्वयंसेवक मयूर संजय महाजन यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे प्रसिद्धी प्रमुख प्रा.डॉ.संजय धर्मा चौधरी कळवतात.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !