फेरफार नोंदी काढून देण्यासाठी आठशे रुपयांची लाच : तळोद्यात खाजगी पंटराला एसीबीकडून अटक
ACB arrests private punter in Talodia for accepting bribe of Rs 800 to remove tampered records तळोदा (8 जानेवारी 2025) : फेरफार नोंदी तळोदा तहसीलमधून काढून देण्यासाठी आठशे रुपयांची लाच मागून स्वीकारणार्या तळोदा तहसील कार्यालयातील खाजगी पंटर राजेंद्र कुमार नारायण क्षत्रीय (56, रा.सोमावल तालुका) यास नंदुरबार एसीबीने बुधवारी सायंकाळी अटक केली.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदाराची तळोदा तालुक्यातील मौजे जुवानी व सिंगसपूर शिवारात शेती आहे. नमूद शेती तक्रारदार यांच्या आजोबांच्या नावावर असून ते मयत आहेत. या शेतीचे वारसदार म्हणून तक्रारदार यांना नोंद करावयाची होती व यासाठी तक्रारदारास तहसील कार्यालय तळोदा येथुन फेरफार नोंदी व ईतर कागदपत्रांची आवश्यकता होती. यासाठी तक्रारदार यांनी दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी तहसील कार्यालय, तळोदा येथे शेती गटाचे फेरफार नोंदी व सातबारा उतारे मिळणे बाबत अर्ज केला होता. यावेळी तक्रारदारास शेतीचे फेरफार नोंदी व सातबारा उतारे काढून देण्यासाठी आरोपी राजेंद्र कुमार याने 8,00 रुपये लाच मागितली. नंदुरबार एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर बुधवारी सापळा रचून आरोपीला लाच स्वीकारताच अटक करण्यात आली.
यांनी केली कारवाई
नाशिक एसीबी पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर , नंदुरबार एसीबीचे पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीखक नरेंद्र खैरनार, पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी, विलास पाटील, विजय ठाकरे, देवराम गावीत, हवालदार हेमंत महाले, जितेंद्र महाले, सुभाष पावरा आदींच्या पथकाने ही कारवाई केली.