शिरपूरात 56 हजारांचे गोवंश जातीचे चामडे जप्त : धुळे गुन्हे शाखेची मोठी कारवाई


56 thousand worth of cowhide leather seized in Shirpur : Dhule Crime Branch takes major action शिरपूर (17 जानेवारी 2025) : धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार यांना शिरपूरातील एका संशयीताच्या घरात गोवंश जातीचे चामडे साठवून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने गुरुवारी रात्री उशिरा स्थानिक पोलिसांसह छापेमारी करीत 56 हजार रुपये किंमतीचे 560 गोवंश जातीचे चामडे जप्त केल्याने शहरात खळबळ उडाली. याप्रकरणी सईद अहमद रज्जाक खाटीक (49, मोहम्मदीया चौक, निमझरी रोड, शिरपूर) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार यांना गोवंशी जातीच्या चामड्याची साठवणूक केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकासह शिरपूरात धडक दिली. सईद खाटीक यांच्या घराबाजूला असलेल्या एका घरातून 56 हजार रुपये किंमतीचे चामडे (कातडी) नगरपालिकेच्या ट्रॅक्टरमधून जप्त करण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार, हवालदार आरीफ पठाण, कॉन्स्टेबल मयूर पाटील, कॉन्स्टेबल योगेश जगपात, चालक गुलाब पाटील तसेच शिरपूर निरीक्षक के.के.पाटील, सहा.निरीक्षक हेमंत पाटील, हवालदार रोकडे, हवालदार चंदन सोनार, हवालदार अनिल सोनार, कॉन्स्टेबल सचिन वाघ, कॉन्स्टेबल योगेश दाभाडे, कॉन्स्टेबल गोविंद कोळी, आखडमल, प्रशांत पवार आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.