वरणगावात वीर जवानाच्या पार्थिवाचे दर्शन घेताना मंत्री गिरीश महाजन जखमी


वरणगाव (27 मार्च 2025) : वरणगावातील वीर जवान अर्जुन लक्ष्मण बाविस्कर यांना मानवंदना देण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन गुरुवार, 27 मार्च रोजी वरणगावात उपस्थित होते. पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मिल्ट्रीच्या ट्रकमध्ये चढताना त्यांच्या डोक्याला वाहनाचा रॉड लागल्याने रक्तस्त्राव होवून मंत्री महाजन जखमी झाले.

अशाही परिस्थितीत चक्कर येत असतानाही त्यांनी वीर जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करीत अभिवादन केले. रक्तस्त्राव थांबत नसल्याने माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यासह स्थानिक पदाधिकार्‍यांनी त्यांना खाजगी रुग्णालयात नेल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांनी बाविस्कर कुटूंबाची भेट घेत माझ्यासह राज्य सरकार बाविस्कर परिवाराच्या पाठीशी असल्याचे सांगत मंत्री गिरीश महाजन हे वाहनाद्वारे नाशिक बैठकीसाठी रवाना झाले.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !