दिड लाखांची लाच भोवली : क्रीडा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Sports official in ACB’s net परभणी (27 मार्च 2025) : परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांना दिड लाखांची लाच घेताच एसीबीने बेड्या ठोकल्या आहेत. स्विमिंग पूल बांधण्यास परवानगी देण्यासाठी कविता नावंदे यांनी अडीच लाख रुपयांची लाच मागून त्यातील पहिल्या टप्प्यात लाच स्वीकारताच ही कारवाई करण्यात आली.
एका क्रीडा स्पर्धेचे बिल आणि स्विमिंग पुल मान्यतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी लाच मागितली व दीड लाख रुपये स्वीकारताना त्यांना एसीबीने रंगेहात पकडले आहे. परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.