काय सांगता ! ; अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टच्या गोदामातून 70 लाखांचा नकली माल जप्त


Counterfeit goods worth Rs 70 lakh seized from Amazon-Flipkart warehouse नवी दिल्ली (27 मार्च 2025) : तुम्ही अ‍ॅमेझान वा फ्लिपकार्टवरून काही प्रोडक्ट मागवत असल्यास ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या गोदामांवर छापेकरी करीत तब्बल 70 लाखांहून अधिक किंमतीचे बनावट प्रोडक्ट जप्त केले आहे. अनेक दर्जाहीन आणि प्रमाणपत्रे नसलेली उत्पादने जप्त करण्यात आली आहेत. 15 तास चाललेल्या या कारवाईत बीआयएस अधिकार्‍यांनी सुमारे 70 लाख रुपये किमतीचे गिझर आणि फूड मिक्सरसह 3,500 हून अधिक इलेक्ट्रिकल उत्पादने जप्त केली.

ग्राहकांचे हित लक्षात घेत गुणवत्ता मानकांची अंमलबजावणी करण्यासाठी बीआयएसद्वारे देशव्यापी मोहिम चालवली जात आहे. या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात दिल्ली, गुरुग्राम, फरीदाबाद, लखनौ आणि श्रीपेरंबदूरसह अनेक ठिकाणी अशाच प्रकारचे छापे टाकण्यात आले होते.





सध्या, 769 उत्पादन श्रेणींना भारतीय नियामकांकडून अनिवार्य प्रमाणपत्र आवश्यक आहे. योग्य परवान्याशिवाय या वस्तूंची विक्री किंवा वितरण केल्यास 2016 च्या इखड कायद्यानुसार संभाव्य कारावास आणि दंडासह कायदेशीर दंड होऊ शकतो. अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टने या छाप्यांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यापूर्वी बीआयएसने लखनौमधील अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या गोदामावरही छापा टाकून बनावट वस्तू जप्त केल्या होत्या. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने ऑनलाईन दिले आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !