सावद्याचे सुनील कुरकुरे यांचा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून सन्मान

Sunil Kurkure of Savadya honored by the District Superintendent of Police सावदा (15 मे 2025) : सावदा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी सुनील जानकीराम कुरकुरे यांनी सावद्याचे सहाय्यक निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय गुन्हा उघडकीस आणून उल्लेखनीय कामगिरी बजावली. कुरकुरे यांच्या कार्याची दखल घेत जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्याहस्ते कुरकरे यांचा सन्मान करण्यात आला.
कुरकुरे यांना सन्मानचिन्ह व गौरवपत्र प्रदान करण्यात आले. या सन्मानाने सावदा पोलीस स्टेशनच्या कर्मचार्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

एकता मित्र मंडळ फुलगाव, नातेवाईक मित्र परिवार विविध सामाजिक माध्यमातून कुरकुरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
जळगाव पोलीस दलाने आपल्या कार्याची दखल घेऊन जो सन्मान केला निश्चितपणे अधिक कार्यप्रवण होण्यासाठी मला बळ मिळाले असल्याचे सुनील कुरकुरे यांनी ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ शी बोलताना सांगितले.
