भुसावळात नगराध्यक्ष पदासाठी एक तर नगरसेवक पदासाठी 10 अर्ज दाखल


One application was filed for the post of Mayor and 10 applications were filed for the post of Corporator in Bhusawal. भुसावळ (14 नोव्हेंबर 2025) : भुसावळ नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शुक्रवार, 14 रोजी पाचव्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी भाजपातर्फे रजनी संजय सावकारे यांनी अर्ज दाखल केला तर नगरसेवक पदासाठी 10 इच्छूकांनी अर्ज दाखल केले.

दरम्यान, भुसावळ नगरपालिका आणि वरणगाव या दोन्ही ठिकाणी शुक्रवारी दिवसभर अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांनी निवडणूक शाखेत गर्दी झाली. निवडणुका जवळ आल्याने दोन्ही शहरांत राजकीय वातावरण तापत असून नागरिकांमध्येही मोठी उत्सुकता दिसून येत आहे.

भुसावळात 11 अर्ज दाखल
भुसावळ नगरपालिकेत शुक्रवारी नगराध्यक्ष पदासाठी एक तर नगरसेवक पदासाठी दहा असे मिळून एकूण अकरा अर्ज दाखल झाले. याआधी दाखल झालेल्या अर्जांसह भुसावळमध्ये आतापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी एक आणि नगरसेवक पदांसाठी मिळून एकूण 15 अर्ज दाखल झालेले आहेत.

वरणगावातही 29 अर्ज दाखल
वरणगाव नगरपालिकेतही पाचव्या दिवशी शुक्रवारी अर्ज दाखल करण्यास चांगला प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी येथे 21 अर्ज दाखल झाले असून आतापर्यंत एकूण 29 अर्जांच्या नोंदी झाल्या आहेत. यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी दोन अर्जांचा समावेश आहे. उमेदवार आणि त्यांचे समर्थक यांच्या उपस्थितीत निवडणूक विभागाचे कामकाज शिस्तबद्ध वातावरणात करण्यात आले.

आगामी काही दिवसांत प्रमुख राजकीय पक्षांकडून अधिकृत उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी रणांगणात उतरण्याची शक्यता असून, त्यामुळे राजकीय घडामोडींना आणखी वेग येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शहरांमधील सर्वच पक्षांनी आपली रणनीती अंतिम टप्प्यात नेली असून, स्थानिक पातळीवर चर्चांना उधाण आले आहे. आगामी शनिवारी व सोमवारी अर्जांचा पाऊस पडणार असून त्यानंतर लवकरच अंतीम चित्र स्पष्ट होणार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !