जिल्हाधिकर्यांची पिंपरूडमधील शेती शाळेस अचानक भेट
फैजपूर- पिंपरुड येथे कृषी विभागा मार्फेत पिकावरील रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉप सँप) अंतर्गत कापूस पिकाची शेती शाळा सुरू असून ह्या प्रकल्पास वर्ग क्रमांक सातला जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी शनिवारी भेट दिली. जिल्हाधिकारी ढाकणे यांनी शेतकर्यांना पारंपरीक शेतीबद्दल सखोल मार्गदर्शन केले. अंबाडी, उडीद-मूग, मका, भेंडी, चवळी, झेंडू या सारख्या आंतर पीक व सापळा म्हणून लावावी ज्यामुळे मानवीय आहारात डाळी व घरचा ताजा भाजी-पाला उपलब्ध होईल त्यामुळे विषमुक्त अन्न मिळेल.सोबत कापूस पीकावरील कीड व रोग याची तीव्रता कमी होईल त्यामुळे रासायनिकतेचा वापर कमी होऊन व शुध्द वातावरण निर्मिती होईल व ते मानवी जीवनाला उपयुक्त ठरते. सोबत उपस्थित शेतकर्यांनी शेती पिका विषयी अधिकार्यांशी हितगुज केले. कापसाचा प्रकल्प दिलीप चौधरी यांच्या शेतात घेण्यात आला. एकंदरीत कापसाची गुणवत्ता बघून जिल्हाधिकार्यांनी समाधान व्यक्त केले.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी जिल्हा परीषद सीईओ बी.पी.पाटील, कृषी जिल्हा अधीक्षक संभाजी ठाकूर, उपसंचालक अनिल भोकरे, यावल तहसीलदार जितेंद्र कुंवर, पिंपरुड सरपंच नंदकिशोर चौधरी, सदस्या किरण कोल्हे, राकेश कोल्हे यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.