महाराष्ट्र वाचवण्यासाठी लॉकडॉऊन 31 मे पर्यंत वाढवला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : राज्यात 50 हजार उद्योग सुरू झाले असून 65 हजार उद्योगांना परवानगी देण्यात आली असून महाराष्ट्राला वाचवायचे असल्याने 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवल्याचंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. सोमवारी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर रात्री त्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. लॉकडाऊन वाढले असले तरी, आपण ग्रीन झोनमध्ये उद्योग सुरू करीत असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्र वाचवण्यासाठी टिकेचा धनी होण्यास तयार
मुख्यमंत्री म्हणाले की, देशात कोरोनाबाधितांचा आकडा 90 हजारांच्यावर गेला आहे तर राज्यातही कोरोनाग्रस्तांची संख्या 30 हजार पार झाली आहे त्यामुळे, महाराष्ट्र सरकारने चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन घोषित करत 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवले आहे. आता, लॉकडाऊन वाढले असले तरी, आपण ग्रीन झोनमध्ये उद्योग सुरू करीत आहोत. राज्यात 19 हजार 900 पर्यंत रुग्ण असले तरी 5000 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होत आहेत ही चांगली बाब आहे मात्र आपण काळजी घ्यायलाच हवी. मी टीकेचा धनी होईल, महाराष्ट्राला वाचविण्यासाठी मी वाईटपणा घ्यायला तयार आहे, असेही ते म्हणाले. रेड झोनमधील परवानगी दिल्यानंतर प्रादुर्भाव वाढला तर सुरू होणार्या अघोषित लॉकडाऊनची कल्पना केल्यावरही अंगावर काटाच येतो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगत ग्रीन झोनमधील उद्योगांना परवानगी देण्यात येत असल्याचे ते म्हणाले.


