राजकीय चारित्र्यशिलतेचा आदर्श ठेवून गेलेले : लोकनेते स्वर्गीय हरीभाऊ .
भुसावळ (16 जून 2026) : माजी खासदार आणि आमदार म्हणून आपली जवळपास वीस वर्षांची राजकीय क्षेत्रातील चारित्र्यवान लोकनेते म्हणून कायमची ओळख जन मनावर ठेवून गेलेले शेतकरी कष्टकऱ्यांचे खऱ्या अर्थाने कैवारी स्वर्गीय हरिभाऊ यांची आज पुण्यतिथी. सहा वर्षांपूर्वी कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य महाभयानक जागतिक संकटाच्या काळात भाऊंनी आपली सोडलेली साथ आजही तितकीच प्रचंड वेदनादायी आणि अस्वस्थ करणारी आहे.
१६ जून २०२० रोजी मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलला उपचार घेत असताना भाऊंनी या जगाचा कायमचा आकस्मिक निरोप घेतला. आपल्यातून जाऊन आज भाऊंना सहा वर्षे पूर्ण झालीत परंतु असा एकही दिवस महिना जात नाही की भाऊंची कुठल्या ना कुठल्या कारणाने आठवण आली नाही .
यावल तालुक्यातील भालोद हे भाऊंचं गाव. सामान्य शेतकरी व अध्यात्मिक विचारसरणीच्या कुटुंबातून भाऊ आलेले. उच्च शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे न लागता आपल्या कष्टकरी बापाच्या शेतकरी -शेती व्यवसायातच ते रमले. एकत्र कुटुंब पद्धती मधून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाल्याने प्रेम आणि विश्वासाने मैत्रीचा परिघ त्यांनी विस्तीर्ण केला. सामाजिक कार्याची आस्था आणि आवड असल्याने विविध सामाजिक उपक्रमांमधून कृतिशील सहभाग त्यांनी दिला.
राजकीय क्षेत्र हे भाऊंच करियर नव्हतं तर ती त्यांची निव्वळ समाजसेवा होती , हे त्यांच्या राजकीय जीवनाचे मूल्यांकन (ऑडिट )केल्यानंतर आपल्या लक्षात येते. काही माणसे राजकारणातील पद आणि प्रतिष्ठेने मोठी होतात तर काही माणसे आपल्याला मिळालेल्या पद आणि सेवेला आपल्या कर्तुत्वाने मोठी करतात….. स्वर्गीय भाऊंनी आपल्या १९९९ ते २०१९ या वीस वर्षांच्या राजकीय सेवेचा जो मानदंड आमच्यासमोर ठेवला आहे तो नक्कीच वर्तमान पिढीतील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठी नक्कीच दीपस्तंभ ठरावा असाच आहे…. दोन वेळेस आमदार आणि दोन वेळेस खासदार म्हणून लोकसेवा केलेले हे उत्तुंग व्यक्तिमत्व होते… बुद्धांच्या शांती आणि करुणेचा विचार हा त्यांच्या जगण्याचा स्थायीभाव होता. स्वभावाने अत्यंत शांत , प्रेमळ आणि संवेदनशील असलेले भाऊ जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून तर ग्रेट होतेच पण त्याहीपेक्षा माणूस म्हणून ग्रेट होते….. भांडण , वादविवाद, अहंकाराने ओत प्रोत भरलेली विधाने यांनी हरिभाऊंच्या व्यक्तिमत्त्वाला साधा स्पर्शही केला नाही. अर्थात चक्रधर स्वामींच्या विचारातील सामाजिक समता , लहान मोठ्यांचा आदर , विज्ञाननिष्ठ भाव यांचा त्यांच्या जीवनशैलीवर प्रचंड प्रभाव होता. त्यामुळेच माणूसपणाला लहान करणारे अवगुण त्यांच्या आसपासही फिरकले नाहीत …..सदैव हसतमुखाने आलेल्या प्रत्येक व्यक्तीशी होणारा त्यांचा संवाद आपुलकीचे व प्रेमाचे नाते जोडणारा असायचा. जात, धर्म ,पंथ यांच्या सीमारेषांनी भाऊंच्या सामाजिक आणि राजकीय कार्याला कधीच अडथळे आले नाही. कारण भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही मूल्ये कृतीत जगणारे ते आदर्श लोकनेते होते. आपल्या पद आणि प्रतिष्ठेच्या पदांनी त्यांनी मानसे जोडण्याचे काम केले , तोडण्याचे नाही. उर्मट आणि बेजबाबदार संवाद स्वर्गीय हरिभाऊंच्या आयुष्यात त्यांच्या अत्यंत जवळ वावरताना कधीही आम्हास दिसला नाही. दिसली ती सामान्य जनते प्रती आस्था आणि कळवळा.
अस्सल शेतकरी कुटुंबातून भाऊ आल्याने शेती -माती वर जगणाऱ्या सामान्य शेतकऱ्याचे दुःख त्यांनी जवळून अनुभवले होते. त्यामुळेच मतदार संघातील शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना अत्यंत जिव्हाळ्याचे वाटतं… त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शासन दरबारी अस्वस्थ होऊन ते पाठपुरावा करीत असत.
मला आठवतं “शेळगाव मॅरेज ” या धरणाची प्रशासकीय मान्यता व तांत्रिक मंजुरी मिळून आर्थिक तरतूद जेव्हा झाली तेव्हा आम्ही दोघे तत्कालीन मनोरा आमदार निवासातील खोली क्रमांक ५१३ मध्ये होतो…. भाऊ पुन्हा पुन्हा या धरणाची मिळालेली प्रजिमा (पत्र )पुन्हा पुन्हा कधी व्याकुळ तर, कधी आनंदी नजरेने पाहत होते…या धरणामुळे या परिसरातील शेती, सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या होणाऱ्या व्यवस्था यामुळे लोकांच्या जीवनात जे सुखद परिवर्तन होणार आहे त्याचा आनंद भाऊंच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होता. त्यांच्यातील कृषीमित्र आपल्या शेतकऱ्यांच्या जीवनात आपण या पाण्याच्या माध्यमातून हरितक्रांती करू शकतो ,या आनंदाने आनंदून गेला होता. आज या धरणाच्या जलाशयात रखरखत्या उन्हात साठलेला अफाट जलसाठा पाहून भाऊंचा तो आनंदी होणारा चेहरा आमच्या समोर येतो….. शेतीच्या शाश्वत विकासाची त्यांची दृष्टी होती त्यामुळेच शेती समृद्ध झाली तर शेतकरी समृद्ध होऊन गाव खेडे आर्थिक सक्षम होतील. हा ध्यास घेतलेले भाऊ होते. आपल्या आमदारकीच्या काळात त्यांनी शेळगाव बॅरेजच्या पूर्ती साठी आपली सारी राजकीय शक्ती खर्च केल्याचे मी अनुभवले आहे.
रावेर- यावल तालुक्यातील काळया कसदार शेतीला बारमाही पाणी कसे उपलब्ध होईल या संदर्भात त्यांनी केंद्र सरकारला प्रस्तावित केलेला महाकाय जल पुनर्भरण प्रकल्प (मेघा रिचार्ज प्रोजेक्ट) हे भाऊंचे खऱ्या अर्थाने स्वप्न होते. सातपुड्यात पावसाळ्यात पडणारे पाणी सातपुड्याच्या पायथ्याशी प्रचंड लांबीचा कॅनॉल (पाट) करून त्यात पाणी अडवून त्याचे जल पुनर्भरण करून सिंचन करण्याचे विविध मार्ग भाऊंनी केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला सुचविले होते. आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनात ते हयात असेपर्यंत त्यांनी या महाकाय प्रकल्पाच्या उभारणीसाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच या प्रकल्पाचे हवाई सर्वेक्षण देखील झाले होते. हवाई सर्वेक्षणासाठी ज्यावेळेस या क्षेत्रातील अभ्यासकांचे हेलिकॉप्टर जेव्हा फैजपूर या ठिकाणी आले तेव्हा त्या अभ्यासकांचे स्वागत करताना भाऊ पुन्हा प्रचंड आनंदून गेले होते. कारण गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकल्पाच्या निर्मितीच्या प्रस्तावासाठी ते सतत प्रयत्नशील होते…. मध्यप्रदेश ,महाराष्ट्र व केंद्र सरकारच्या जलसिंचन विभागाच्या बैठकांना ते स्वतः अनेकदा हजर होते…..या दोनच गोष्टीचे जरी वर्तमान काळातील राजकीय कार्यकर्त्यांनी मूल्यांकन (ऑडिट) केल्या तरी भाऊंच्या सामाजिक आणि राजकीय कार्याच्या दृष्टी आणि दृष्टिकोनाची ओळख झाल्याशिवाय राहणार नाही…. स्वतःपेक्षा समाजाचा शाश्वत विकास कसा होईल याची दृष्टी त्यांना असल्यामुळे त्यांनी शेती हाच ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा आहे हे पक्के ओळखून शेतीला पाणी आणि वीज कशी मिळेल यासाठी आपली राजकीय ताकद खर्च केली . मतदारसंघात अनेक ठिकाणी विद्युत उपकेंद्रांची निर्मिती ही त्यांच्याच काळात खऱ्या अर्थाने झाली आहे ….
ते खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे कृतिशील नेते होते..
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या जीवनाबद्दल बोलताना एके ठिकाणी म्हणतात ,” सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या लोकप्रतिनिधी अथवा कार्यकर्त्याचे आत्मबळ म्हणजे त्याचे चारित्र्य असते. ज्या नेत्याकडे हे चारित्र्य असते तोच नेता समाजाचा दमदार आदर्श नेता होऊ शकतो.” या विधानाचा स्वर्गीय हरिभाऊंच्या जीवनाशी अत्यंत जवळचा संबंध आहे. त्याचे कारण भाऊंच्या सहवासात जवळपास तेवीस वर्ष (अत्यंत जवळ )राहण्याचे भाग्य मला लाभले होते . त्यांच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी पासून तर वैचारिक बैठकीपर्यंत….. पक्ष निष्ठेपासून सर्वसामान्य माणसाच्या बांधिलकीपर्यंत…. मला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू अनुभवायला मिळाले. शुद्ध शाकाहारी भोजन घेणारे भाऊ पिठलं भाकरीला पंच पकवांन्य समजून आवडीने खात असत…., आमदार निवासातील कॅन्टींग मध्ये मेथीची भाजी आणि ठेचा -भाकर खाणारे भाऊ , मुंबईतील सारा प्रवास भाड्याच्या टॅक्सीने करणारे भाऊ …… रेल्वेच्या प्रवासात स्वतःची सीट गरजू पेशंटला देऊन स्लीपर मधून प्रवास करणारे भाऊ….. गोरगरीब , दीन दलित ,आदिवासी ,शेतमजूर विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयातून चांगल्या चांगल्या सुविधा कशा उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करणारे भाऊ…… बस वेळेवर येत नाही ही मुलींची तक्रार आल्यावर थेट जागेवरून जिल्ह्याच्या विभाग नियंत्रकांना फोन करून माझ्या मुलींची काळजी घ्या , हे सांगणारे भाऊ…..गोरगरिबांच्या मुलांना शिकवण्यासाठी वशिल्याने नाही तर गुणवत्तेने प्राध्यापक नियुक्ती करणारे भाऊ ….. सार्वजनिक जीवनात राजकीय आचारसंहिता चोवीस तास डोक्यात ठेवून आपलं वर्तन करणारे स्वर्गीय हरिभाऊ…… आम्हास कसे विसरता येतील…..! भाऊंनी सत्तेतून पैसा कमावला नाही तर लाख मोलाची इज्जत आणि प्रतिष्ठा कमावली…. आपल्या सामाजिक आणि राजकीय चारित्र्यावर साधा वाईट वर्तनाचा डाग कधीच पडू दिला नाही…. एक काम कमी झालं तरी चालेल पण मी माझ्या जनतेशी खोट बोलणार नाही… नियमबाह्य काम करणार नाही ….त्यांच्यात भांडण लावणार नाही… राजकीय स्पर्धेतून कार्यकर्त्यांना संपवणार नाही. हे तत्व भाऊंनी अखेरपर्यंत पाळलं. त्यामुळे शुद्ध सोन्यासारखे चकाकणारे भाऊंचे राजकीय आणि सामाजिक चारित्र्य कोहिनूर हिऱ्यापेक्षा नक्कीच कमी नव्हते….!
खरंतर राजकीय क्षेत्रातील लोक हे अभ्यासू आणि चारित्र्यसंपन्न असलेच पाहिजे . परंतु आज सार्वजनिक जीवनातील वास्तव पाहिले की , याचीच वानवा दिसते… जाती-धर्मातील व्देषाच अप्पल पोटी राजकारण भाऊंनी कधीच केले नाही…. जे केले ते समाजासाठी….समाजाच्या विकासासाठी . शेतीमातीत राबणाऱ्या साऱ्या दीन दलीत , सामान्य माणसांच्या उत्थानासाठी…
राजकारणातील काटशहाचे कुटील डावपेच भाऊ कधीच खेळले नाही. त्यांचा तो स्वभावच नव्हता …. त्यामुळे वेळोवेळी त्यांना त्याची राजकीय किंमतही चुकवावी लागली परंतु त्यांनी नीतिमत्ता सोडून राजकारण कधीच केले नाही. पराभवाची चिंता ही केली नाही….. राजकारणाच्या राजकारणाच्या स्पर्धेत ते पराभूत झालेत परंतु माणुसकीच्या आणि शुद्ध चारित्र्य शीलतेच्या परीक्षेत त्यांना कोणीही हरवू शकला नाही…. म्हणूनच राजकारणात राहूनही सर्वपक्षीय मित्रपरिवार लाभलेले हरिभाऊ जिल्ह्याच्या राजकारणातील एकमेव हिरे ठरतात…. सत्ता आणि संपत्ती असल्यावर सगळेच कौतुकाचे डफ वाजवतात. परंतु स्वर्गीय भाऊ असे व्यक्तिमत्व होते की आजही सामान्य माणसांच्या मनात त्यांच्या कर्तृत्वाचे पोवाडे नेहमीच गायले जातात…. अनेक दशके शेतीमातीशी इमान ठेवलेल्या या चारित्र शुद्ध लोकनेत्याचे जीवन पुढील पिढीतील कार्यकर्त्यांना दीपस्तंभ ठरल्याशिवाय राहणार नाही. असे जीवन ते जगलेत…..
आमच्या या लाडक्या लोकनेत्याच्या स्मृतीं , विचार व कर्तुत्वाला भावपूर्ण आदरांजली…विनम्र अभिवादन….!
श्रद्धेय भाऊ, तुमचे विचार आणि कार्य आम्हास नक्कीच सामाजिक सेवेच्या वाटेवर प्रेरणा देत राहील…..!

प्रा.डॉ. जतीन श्री.मेढे /भुसावळ
९५४५०७२६००
९५४५०७२६००