खासदार संजय राऊत स्पष्टच म्हणाले ; फुटीर खासदारांचा मान-सन्मान म्हणजे 50 ते 75 कोटी रुपये

मतदारसंघाचा निधी पडून असताना तिकडे केवळ कंत्राट घेण्यासाठीच प्रवेश


MP Sanjay Raut stated bluntly: the ‘honor and respect’ for the breakaway MPs amounts to ₹50 to ₹75 crore मुंबई (23 जून 2026) : ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करीत सहा खासदारांनी स्वतंत्र गट नोंदणी शिंदे सेनेत प्रवेश केला. यावरून टीका सुरू असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा या खासदारांवर टीका केली. आमच्याकडे असताना यांचा मान-सन्मान नव्हता का? असा प्रश्न त्यांनी करीत फुटीर खासदारांचा मान-सन्मान म्हणजे 50 ते 75 कोटी रुपये असल्याचे ते म्हणाले. 2029 पर्यंत देशाच्या राजकारणात काय होईल याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे खुर्चीवर राहतील का नाही ? याची शाश्चती नाही. महाराष्ट्रात काय होईल हे सांगता येत नाही. आम्ही तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे बघितले आहेत.

तर संजय दिना पाटील यांनी राजीनामा द्यावा
संजय दिना पाटील यांनी काही बोलण्यापूर्वी खासदारकीचा राजीनामा द्यावा. उद्धव ठाकरेंशी भांडण नव्हते तर त्यांनी पक्ष सोडायला नको होता. ज्यांच्याशी त्यांचे भांडण आहे त्यांच्यासंदर्भात मातोश्रीवर येत चर्चा करायला हवी होती. या सर्व गोष्टीचा आणि पक्ष सोडण्याचा काही संबंध नाही. ते हे का सांगत नाहीत की 13 तारखेला त्यांच्याकडे 15 कोटी रुपयांचे खोके आले, त्यानंतर 14 तारखेला पुन्हा 5 कोटी रुपये आले मग मी दिल्लीतील पक्षाच्या बैठकीचा व्हीप धुडकावला आणि गायब झालो त्यानंतर मला उरलेले 35 कोटी रुपये मिळाले हे संजय दिना पाटील यांच्यासह सर्व गद्दारांनी सांगितले पाहिजे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

आम्ही काय इराणसारखे हल्ले करणार होतो का ?
संजय राऊत म्हणाले की, नांदेडमध्ये काल रात्री शिवसैनिकांनी काही गद्दार खासदारांच्या गाड्या अडवण्याचे काम केले. दोन का तीन जणांसाठी 850 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तुम्ही काय आम्हाला काय सांगता? आम्ही काय इराणसारखे हल्ला करणार होतो का? असा सवाल राऊतांनी केला आहे.

पैसा फेको तमाशा देखो सुरू
संजय राऊत म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा नाशिक विधान परिषद निवडणुकीत पराभव झाला. भाजपचे सर्व मते गोकुळ गीते यांना पडले पुढच्या दोन तासांमध्ये त्यांनी गोकुळ गितेंना विकत घेत त्यांच्या पक्षामध्ये आणले. पैसा फेको तमाशा देखो हे महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे. शिंदेंनी काल पक्षात आलेल्या 6 खासदारांचा मान सन्मान ठेवू असे म्हटले. मग काय आमच्याकडे त्यांचा मान सन्मान नव्हता का? यांचा मान-सन्मान म्हणजे 50 ते 75 कोटी रुपये आहे.

पक्ष सोडणार्‍यांनी खासदार निधी वापरला नाही
संजय राऊत म्हणाले की, निधीसाठी शिंदेंसोबत गेलो असे म्हणणार्‍या खासदारांनी त्यांचा खासदार निधीमधील पैसे सुद्धा खर्च केलेले नाहीत. प्रत्येकांच्या मतदारसंघासाठी असलेला 15-15 कोटी रुपये निधी पडून आहे. हा निधी तुम्ही का वापरला नाहीत, त्यासाठी तुम्हाला कोणी अडवले होते. विकासासाठी तिकडे गेलो म्हणतात मग खासदारांना मिळणार्‍या निधीचा वापर का केला नाही. शिंदे गटात गेल्यावर त्यांना कंत्राट मिळणार 200 कोटी 300 कोटी रुपयांचे आणि त्यातील 25 टक्के त्यांच्या घरात जाणार हा त्यांचा मान-सन्मान आहे, मतदारसंघातील जनता काही खुळी नाही.

..तर ही लोकं कुपोषनाने मेली असती
संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंच्या वक्तव्याची खिल्ली शिंदे गटाकडून उडवण्यात आली. बाळासाहेब ठाकरेंनी अनेक वृद्धाश्रम आणि पाळणघरं सुरू केली. शिंदे गटात गेलेली लोकं त्याच पाळणाघरातील आहेत. त्यांचे पालन-पोषण मातोश्रीकडून करण्यात आले. नाहीतर हे लोकं कुपोषनाने मेली असती. हे लोकं जनतेची कामे करू शकत नाही ते केवळ कंत्राटदारांचे कामे करतात. जनता त्यांना माफ करणार नाही.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !