गोदावरी तंत्रनिकेतनतर्फे आरंभ (इंडक्शन) कार्यक्रम 2026 उत्साहात


जळगाव (मंगळवार, 18 ऑगस्ट 2026) : गोदावरी फाउंडेशन संचलित, गोदावरी तंत्रनिकेतन, जळगाव येथे नव्याने प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षाच्या तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांसाठी आरंभ (इंडक्शन) कार्यक्रम 2026-27 चे 17 व 18 ऑगस्ट 2026 रोजी आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन वातावरण, शैक्षणिक पद्धती, विविध संधी आणि विद्यार्थी म्हणून असलेल्या जबाबदार्‍यांची ओळख करून देणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागताने झाली. डॉ. विजयकुमार पाटील, प्राचार्य, गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नवीन गोष्टी शिकण्याची वृत्ती, आत्मविश्वास, संवादकौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, शिस्त तसेच तांत्रिक व व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्याचे महत्त्व स्पष्ट केले.

तंत्रनिकेतन समन्वयक प्रा. दीपक झांबरे यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन नियम, शैक्षणिक धोरणे, शिस्त, उपस्थिती तसेच विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील उपलब्ध सुविधा व संधींचा पुरेपूर उपयोग करावा, असे आवाहन करण्यात आले.

दुपारच्या सत्रात डॉ. प्रशांत वारके, संचालक, ॠखचठ, जळगाव यांनी र्कीारप तरर्श्रीशी, उीशरींर्ळींळीूं रपव ॠशपवशी र्र्एिींरश्रळीूं या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी मानवी मूल्ये, परस्पर आदर, सर्जनशील विचार, जबाबदार वर्तन आणि समानतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

यानंतर विविध समित्यांची ओळख, प्रथम वर्ष विभागातील प्राध्यापकांशी परिचय तसेच विद्यार्थ्यांमधील क्षमता ओळखून त्यांचा विकास करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

दुसर्‍या दिवशी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. विजयकुमार पाटील यांनी पालकांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास ही विद्यार्थी, पालक आणि प्राध्यापक या तिघांची संयुक्त जबाबदारी असल्याचे सांगितले. पालकांनी विद्यार्थ्यांना योग्य पाठिंबा द्यावा, त्यांच्या क्षमता व अडचणी समजून घ्याव्यात आणि त्यांच्याशी सकारात्मक संवाद साधावा, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी पालकांनी विद्यार्थ्यांच्या विकासाबाबत तसेच संस्थेकडून असलेल्या अपेक्षा व सूचना याबाबत आपला मौल्यवान अभिप्राय दिला.

तंत्रनिकेतन समन्वयक प्रा. दीपक झांबरे यांनीही पालकांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना योग्य स्वातंत्र्य व आवश्यक अवकाश देणे, त्यांना समजून घेणे आणि त्यांच्याशी नियमित संवाद साधणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

यानंतर माजी विद्यार्थ्यांशी संवाद सत्र घेण्यात आले. यामध्ये डिप्लोमा पूर्ण केलेल्या माजी विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून आपले शैक्षणिक अनुभव, करिअरचा प्रवास, आलेल्या अडचणी आणि पुढील वाटचालीसाठी उपयुक्त मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अंतिम सत्रात ‘घ’ डलहशाश बाबत मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. पी. पी. चौधरी, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव, तसेच प्रा. नितीन पाटील, अधिष्ठाता यांनी विद्यार्थ्यांना ‘घ’ डलहशाश, शैक्षणिक रचना, मूल्यमापन पद्धती, क्रेडिट्स आणि तंत्रनिकेतन शिक्षणातील विविध महत्त्वाच्या बाबींची माहिती दिली.

हा दोन दिवसीय कार्यक्रम प्रा. नेहा चौधरी आणि प्रा. हर्षा पाटील,इंडक्शन प्रोग्राम समन्वयक यांच्या समन्वयातून तसेच प्रथम वर्ष विभागातील सर्व प्राध्यापकांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वेणू फिरके यांनी उत्कृष्टरीत्या केले. या दोन दिवसीय इंडक्शन कार्यक्रमाला प्रथम वर्ष तंत्रनिकेतनचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमातून विद्यार्थी व पालकांना शैक्षणिक तसेच व्यक्तिमत्त्व विकासाबाबत मौल्यवान मार्गदर्शन मिळाले आणि नव्या शैक्षणिक प्रवासाची सकारात्मक सुरुवात झाली. कार्यक्रमाचा समारोप आनंददायी व उत्साहपूर्ण वातावरणात झाला.

कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर, डॉ. वर्षा पाटील मॅडम (सचिव), डॉ. केतकी पाटील मॅडम (सदस्य), डॉ. वैभव पाटील सर (डीएम कार्डिओलॉजिस्ट) व डॉ. अनिकेत पाटील सर यांनी कौतुक केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !