आता पावसाळी अधिवेशन 3 ऑगस्ट पासून : मुख्यमंत्री


मुंबई : विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन 22 जून रोजी पासून नियोजित होते. कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन आता 3 ऑगस्ट 2020 पासून घेण्याबाबत आजच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. दरम्यानच्या काळात आवश्यकता भासल्यास 3 ऑगस्टपूर्वी पुरवणी मागण्यासांठी एक दिवसाचे विशेष अधिवेशन घेण्याची गरज निर्माण झाल्यास वित्त विभागाकडून यासंदर्भातील माहिती घेऊन त्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

यांची होती बैठकीला उपस्थिती
आज विधानभवनात झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधान परीषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्य आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत पावसाळी अधिवेशनाबाबत सर्वांनी एकमताने निर्णय घेऊन 3 ऑगस्ट 2020 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !