अमळनेरात रेल्वे उड्डाणपुलावरून पडल्याने ज्योतिषाचा मृत्यू
अमळनेर (सोमवार, 28 सप्टेंबर 2026) : दुचाकीवरून मुलीसह जाणार्या पित्याचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. हा अपघात रविवार, 27 रोजी सायंकाळच्या सुमारास घडला. विजय घनश्याम भार्गव उर्फ विजू महाराज (45, रा.केशव नगर, अमळनेर) असे मयताचे नाव आहे. विजय हे भृगु ज्योतिषी फर्मचे ज्योतिष विशारद म्हणून परिचित होते.
दुचाकीला अपघात
विजू महाराज हे मुलीसोबत दुचाकी (क्रमांक एम.एच.19 बी.ई.1029) वरून मुलीसोबत शहराकडून घरी केशव नगराकडे जात असताना तत्वज्ञान केंद्राजवळ कुठल्यातरी वाहनाचा कट लागल्याने दोन्ही जण दुचाकीवरून खाली पडले तर विजय भार्गव हे थेट पुलावरून तत्वज्ञान केंद्राजवळ पडले. जखमी अवस्थेत बराच वेळ ते विव्हळत पडले होते. त्यांना डोक्याला आणि पोटाला गंभीर मार बसला. प्रताप महाविद्यालयाचे कर्मचारी प्रवीण डबेलकार व भार्गव यांची पत्नीने धाव घेत तातडीने अॅपेद्वारे डॉ.अनिल शिंदे यांच्या रुग्णालयात हलवले परंतु तोपर्यंत प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी मृत घोषित केले. मयताच्या पश्चात पत्नी, आई व मुलगी असा परिवार आहे.
