स्व.हरीभाऊ जावळेंच्या निधनाने जिल्ह्याची अपरीमीत हानी
लोकसंघर्षच्या प्रतिभा शिंदे यांनी व्यक्त केली भावना
फैजपूर : माजी खासदार व भाजपाचे जिल्हाध्यक्ष स्व.हरीभाऊ जावळे यांच्या अकस्मात जाण्याने राजकीय व सामाजिक क्षेत्राची तसेच जळगाव जिल्ह्यात अपरीमीत हानी झाली असून लोकांचे प्रश्न समजवून घेत त्यांच्या बाजूने बोलणारे हरीभाऊ हे अतिशय संयमी, असे नेते होते, अशी भावना लोकसंघर्षच्या प्रतिभा शिंदे यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, वन जमिनीच्या प्रश्नांबाबत खासदार असताना त्यांनी लोक संघर्ष मोर्चाला दिल्लीत नेहमीच भरीव अशी साथ दिली, आमचे प्रश्न दिल्लीतील नेत्यांपर्यंत पोहविण्यासाठी ते कित्येक वेळा आम्हाला खासदार असताना दिल्लीतील भाजप नेत्यांकडे घेवून गेलेत. कोणाबद्दल कटुता न बाळगणारे आस्थेने फोन करून ताई कोरोनात काळजी घे सांगणारे हरीभाऊ आपल्यात नाहीत ह्यावर विश्वासच बसत नाही. हरीभाऊंच्या जाण्याने आपण एक संयमी व सर्वांशी मैत्रीचे नाते जपणारा राजकारणाबरोबर समाजकारण महत्वाचे मानणारा एक महत्वपूर्ण नेता गमावल्याने जिल्ह्याची व राज्याची अपरीमीत हानी झाली असल्याचे प्रतिभा शिंदे म्हणाल्या.
