न्हावी ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सीजन यंत्रणेचे लोकार्पण


प्रत्येक ग्रामीण भागात अशा यंत्रणेची गरज : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

फैजपूर : शहरवासीयांच्या लोकसहभागातून न्हावी ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात आलेल्या 30 बेडच्या ऑक्सिजन यंत्रणेचे बुधवारी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येऊन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. यावेळी आमदार शिरीष चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती
जिल्हाधिकारी राऊत यांनी ग्रामीण स्तरावर कोरोना रुग्णांना मिळणारे आधुनिक, दिलासादायक व तात्काळ सुविधांचे कौतुक केले व प्रत्येक ग्रामीण भागात अशा यंत्रणा उभ्या रहाव्यात, अशी आशा व्यक्त केली.

मदतीसाठी सदैव तत्पर : आमदार चौधरी
आमदार शिरीष चौधरी यांनी रावेर विधानसभा क्षेत्रात मदतीचा हात देण्यासाठी सदैव तत्पर राहील. यावेळी त्यांनी कोरोना योद्ध्यांचा तोंड भरून कौतुक केले. यावल तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना ऑक्सीजनअभावी रुग्णांना जळगाव व अन्य ठिकाणी उपचारासाठी रवाना करावे लागत होते त्यात रुग्ण दगावण्याचा ही धोका होता त्यामुळे न्हावी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन यंत्रणा उभी राहावी यासाठी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी शहरवासीयांना आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील विविध सहकारी संस्था त्यात सातपुडा अर्बन, लक्ष्मी नागरी, डी.टी.चौधरी सहकारी संस्था, त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती, शहरातील नगरसेवक, मुख्याधिकारी, वसंतराव विष्णू पाटील औद्योगिक वसाहत, शेतकी संघ यांच्या मार्फत उभारलेल्या अडीच लाखांच्या लोकवर्गणीतून ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
यावेळी नगराध्यक्षा महानंदा होले, पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी, न्हावीच्या सरपंच भारती चौधरी, मसाका चेअरमन शरद महाजन, तहसीलदार जितेंद्र कुंवर, रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे, मसाका संचालक नरेंद्र नारखेडे, जिल्हा परीषद गटनेते प्रभाकर सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मुन्ना पाटील, यावल तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध सरोदे, सर्कल जे.डी.बंगाळे आदी उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !