रोटरी क्लब ऑफ भुसावळतर्फे कोरोना कर्मयोगींचा सन्मान
भुसावळ : कोरोनाच्या कठीण परीस्थितीत रुग्णांची सेवा करीत व स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावणार्या सेंटर रेल्वे हॉस्पिटल भुसावळच्या परीचारिका सिस्टर तिरके, सिस्टर रामवती, सिस्टर करुणा आणि आयसोलेशन वॉर्डमधील सर्व सिस्टरचा त्यांच्या उत्तम सेवेसाठी रोटरी क्लब ऑफ भुसावळचे प्रेसिडेंट रोटरीयन जी.आर.ठाकूर यांच्या हस्ते एक बेडशीट, सॅनिटायझर बॉटल, मास्क व एक सर्टिफिकेट देऊन पंधरा कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला. दहा कॅज्युअल लेबर कर्मचारी, सफाई कामगार यांचाही गौरव करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी डॉक्टर शंकर, अबुस्कर व डॉक्टर विक्रांत सोनार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन राधेश्याम लाहोटी होते.
याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ भुसावळ प्रेसिडेंट जी.आर.ठाकूर, रोटरीयन सतीश अग्रवाल, राजेश अग्रवाल, महेश भराडे आणि रोटेरियन आरती चौधरी उपस्थित होते.

