संवाद सोशल ऑर्गनायजेशनचा कुटुंबाला आधार
सदस्याच्या मृत्युनंतर मुलाच्या शिक्षणासाठी दिले एक लाख
भुसावळ : फेकरी येथील संवाद सोशल ऑर्गनायजेशन या सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणार्या क्लबमार्फत क्लबचे सदस्य शिरीष अडकमोल यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबास मदतीचा हात देण्यात आला. अडकमोल परीवारास मुलांच्या पुढील शिक्षणासाठी एक लाखाची आर्थिक मदत एफडीच्या स्वरुपात क्लबमार्फत देण्यात आली.
सदस्यांनी जमा केला निधी
नुकताच ऑनलाईन वेबिनारद्वारे स्मृतीशेष शिरीष अडकमोल सन्माननिधी कार्यक्रम कैलास निकम व दीपक निकम यांच्या संकल्पनेतून पार पाडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऑर्गनायझेशनचे सेक्रेटरी संजय भटकर होते. संवाद सोशल ऑर्गनायझेशनच्या सदस्यांनी स्वतः निधी यासाठी जमा केला. सामाजिक संस्थेकडून एखाद्या कुटुंबाला एक लाखाची मदत होणे ही सामाजिक आदर्शाची बाब आहे. बदलापूर येथून बदलापूर येथून संस्थेचे अध्यक्ष राहुल वाघ, भुसावळ येथून सेक्रेटरी संजय भटकर, नवी मुंबई वाशी येथून विजय वाघ, औरंगाबाद येथून बी.जी. गायकवाड, डोंबिवली येथून विकास हिवाळे, दीपनगर येथून बबलू वाघ, प्रा. विनोद मोरे व प्रवीण तायडे यांनी मनोगत व्यक्त केले. दिवंगत शिरीष अडकमोल हे सर्वश्रुत असे बहुरंगी अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. फॅक्टरीच्या पंचक्रोशीत सामाजिक स्तरावर त्यांचं खूप मोठे योगदान असल्याचा सूर मान्यवरांच्या मनोगतातून व्यक्त झाला. फ्युचर व्हिजन बेरोजगार तरुणांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा, महिलांसाठी विविध शिबिरे, वेबिनार वरून प्रबोधनसत्र, विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अभ्यास याचे महत्व यावेळी सदस्यांनी विशद केले.
यांनी घेतले परीश्रम
संस्थेने केलेल्या आर्थिक मदतीबद्दल दीपक अडकमोल यांनी ॠण व्यक्त केले. प्रास्ताविक हरुण मंन्सूरी, सूत्रसंचालन सनी वाघ तर आभार प्रदर्शन सुधीर तायडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गुणवंत भटकर, राजेश झाल्टे, विनोद पाटील, विजय थोरात, अरुण निकम, मनीष निकम यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमात वेबिनार वरून मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद, खामगाव, दीपनगर, निंभोरा, भुसावळ, जळगाव येथील सभासदांनी हजेरी लावली.

