शेख जावेद शेख याकुब यांचे नाव नेशन्स प्राईड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये समाविष्ट
यावल : शिक्षक शेख जावेद शेख याकुब यांचे नाव नुकतेच नेशन्स प्राईड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. शेख जावेद शेख याकुब यांनी तब्बल 20 वर्ष शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल व सामाजिक तसेच सांस्कृतीक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल हा मान त्यांना मिळाला आहे.
शेख जावेद शेख याकुब यांनी आपल्या जीवनात अनेक कार्य केले. त्यांचे कार्य बघून त्यांना स्थानिक पातळीपासून ते जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळाले आहेत. शेख जावेद हे तुबा नाज हेल्प मल्टिपर्पज सोसायटी यावलचे अध्यक्ष आहेत व आदिल शाह फारूकी बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी आपल्या संस्थेमार्फत अनेक कार्य केले आहेत व करत आहेत. त्यांच्या मार्फत केलेल्या कार्यांचे प्रस्ताव बघून नेशन्स प्राइड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव समाविष्ट करण्यात आला आहे. मानव प्रगतीसाठी एक डिजीटल बुक रेकॉर्ड आहेत. याच्यात समाजाला नवीन दिशा दाखवण्याचे उद्देशाने काम करणारे यांचा रेकॉर्ड नोंदवला जातो.

