भुसावळ विभागातील 49 कर्मचारी सेवानिवृत्त
भुसावळ : रेल्वेतील प्रदीर्घ सेवेनंतर भुसावळ रेल्वे विभागातून शुक्रवार, 31 जुलै रोजी 49 रेल्वे कर्मचारी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत कर्मचार्यांना रेल्वेतर्फे तत्काळ 13 कोटी 75 लाख रुपये ऑनलाईन खात्यात वर्ग करण्यात आले. या सेवानिवृत्ती संदर्भात रेल्वे द्वारा प्रथम वर्चुअल ऑनलाईन सेवानिवृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे समारंभाचे आयोजन न करता सेवानिवृत्त कर्मचा-यांचा यथोचित सन्मान वर्चुअल ऑनलाईन सेवानिवृती कार्यक्रमाद्वारे तसेच त्यांच्या सेवेच्या कार्यालयात रेल्वे प्रतिनिधी म्हणून खंडवा, अकोला, भुसावळ, जळगाव, नांदगाव, मनमाड, नाशिक आदी ठिकाणी कल्याण निरीक्षकांनी जाऊन पीपीओ फोल्डर दिले. सेवानिवृत्ती बद्दल कर्मचार्यांना विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेककुमार गुप्ता, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोजकुमार सिन्हा, वरीष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे यांनी सेवानिवृत्तीबद्दल मार्गदर्शन करीत पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

