कत्तलीच्या इराद्याने गुरांची वाहतूक : 12 गुरांची सुटका


भुसावळ बाजारपेठ पोलिसांची धडक कारवाईने खळबळ

भुसावळ : कत्तलीच्या इराद्याने बेकायदा गुरांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये 12 गुरांची सुटका केली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पहिल्या कारवाईत सात गुरांची सुटका
भुसावळ-
शहरातील गौसिया नगर भागात सत्तार पहेलवानच्या गल्लीत क्रबस्तानच्या बाजुला नुरोद्दीन शेख सलाउद्दीन (37, रा.गौसिया नगर) याने बकरी ईद सणाच्या पार्श्‍वभूमीवर कतलीसाठी बंदी घातलेली गोवंश जातीची जनावरे कत्तलीच्या उद्देशाने आणल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करीत 84 हजार रुपये किंमतीच्या सात गावराण जातीचे सफेद रंगाच्या बैलांसह गोर्‍ह्यांची सुटका केली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास संदेश निकम करीत आहे त.

दुसर्‍या कारवाईत पाच गुरांची सुटका
भुसावळ-
दुसर्‍या कारवाईत खडका चौफुलीवर नफिस शेख अनवर (28, रा.फोफनार, ता.जि.बर्‍हाणपूर, मध्यप्रदेश, ह.मु.हिंगोणा, ता.यावल) हा 1 रोजी रात्री मध्यरात्री पावणेतीन वाजता पीकअप (एम.एच.46 ई. 4727) मधून पाच गावरान जातीचे गोर्‍हे व बैलाची वाहतूक करताना आढळल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले. बैलांसह वाहन मिळून तीन लाख 53 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपास हवालदार जयेंद्र पगारे करीत आहेत.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, रवींद्र बिर्‍हाडे, समाधान पाटील, रमण सुरळकर, महेश चौधरी, संदीप परदेशी, कृष्णा देशमुख, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, राहुल चौधरी, सचिन पोळ आदींनी केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !