देवळाली ते दानापुर किसान पार्सल गाडी
भुसावळ : मध्य रेल्वे प्रशासनाद्वारा शेतकर्यांना त्यांचा माल बुक करण्यासाठी देवळाली ते दानापूर दरम्यान किसान विशेष पार्सल गाडी 7 ऑगस्टपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्सल गाडीत फळे, भाजीपाला व इतर नाशवंत माल बुक करू शकता येणार असून ही गाडी आठवड्यातून एक दिवस चालवण्यात येणार आहे. या गाडीला नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, बर्हाणपूर, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, कटनी, माणिकपूर, चिवकी, वाराणसी, पंडित दिनदयाळ उपाध्याय नगर आणि बक्सर या ठिकाणी थांबा देण्यात येणार आहे. पार्टीद्वारा अन्य कोणत्या मध्यवर्ती स्टेशनवर थांब्याची मागणी असल्यास अतिरिक्त थांबा देण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.

