उत्कृष्ट कार्याची दखल : नायब तहसीलदार संजय तायडे यांचा गौरव
रावेर : फैजपूर विभागाचा 1 ऑगस्टला महसूल दिनी मिळणारा उकृष्ट निवासी नायब तहसीलदार पुरस्कार रावेरचे निवासी नायब तहसीदार संजय तायडे यांना मिळाला आहे. 1 ऑगस्टनिमित्त महसूल दिनानिमित्त यावल येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तेथे निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांचा महसूल विभागात उकृष्ट काम केल्याबद्दल आमदार शिरीष चौधरी, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
फैजपुर विभागात महसूल वसुलित तायडे अव्वल
रावेर तालुक्यात महसूल वसुलीचा विषय असो की, पीएम किसान अनुदान वाटपाचा विषय असो वा ओला दुष्काळ अनुदान शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचा विषय शिवाय अवैध गौण खनिजवर दंडात्मक कारवाईच्या विषयात फैजपुर विभागात सर्वात जास्त उत्कृष्ट काम केल्याने निवासी नायब तहसीलदार संजय तायडे हे अग्रेसर आहेत त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत शनिवारी महसूल विभागाने घेऊन त्यांचा गैरव केला. पुरस्काराने काम करण्यात अजुन मनोबल वाढेल, असा आशावाद संजय तायडे यांनी वर्तवला.

