वरीष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील यांनी पदभार स्विकारला


भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचा वरीष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील यांनी शनिवारी पदभार स्विकारला. युवराज पाटील हे 2011 च्या भारतीय रेलवे वाहतूक सेवेच्या तुकडीचे अधिकारी असून त्यांनी क्षेत्रीय प्रबंधक म्हणून धनबाद मंडळ (झारखंड) मध्ये कार्य केले आहे शिवाय मंडळ परीचालन प्रबंधक म्हणून मुगलसराय मध्ये कार्य केले आहे व मंडळ वाणिज्य प्रबंधक मुंबई मंडळ, मंडळ परीचालन प्रबंधक म्हणून मुंबई येथे व मध्य रेल्वे मुख्यालयात वरीष्ठ वाहतूक प्रबंधक (सर्वे) म्हणून कार्य केले आहे. पदोन्नतीवर त्यांची भुसावल मंडळात वरीष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक म्हणून युवराज पाटील नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी शनिवारी पदभार स्वीकारला तसेच आर.के.शर्मा यांनीही भुसावळ मंडळात वरीष्ठ मंडळ परीचालन प्रबंधक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !