खंडोबा देवस्थानात संत-महंतांच्या उपस्थितीत जल व माती पूजन
राम माझा, मी रामाचा ही चळवळ व्हावी : महामंडलेश्वर जनार्दन महाराज
फैजपूर : देशातील सर्व हिंदू धर्माचे राम हे दैवत असून राम माझा, मी रामाचा ही चळवळ सुरू झाली पाहिजे. 40 वर्षातून पहिल्यांदा अयोध्येला जात असून हे माझं भाग्यच आहे तर सरकार अपराधांना थांबवू शकत नाही मात्र संस्कार ते थांबवू शकतात, असे उद्गार महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केले. शनिवारी सायंकाळी तापी पूर्ण संगमावरील पवित्र जल व मुक्ताई समाधी स्थळावरील मातीचे
खंडोबा देवस्थानात आयोजित कार्यक्रमात सर्व संत महंत तसेच श्रीरामांना आराध्य मानणार्या सर्व समाजाच्या प्रतिनिधींच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर प्रथम श्रीराम पूजन करण्यात आले. या प्रसंगी महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, स्वामीनारायण गुरुकुलचे शास्त्री भक्ती प्रकाश दास, शास्त्री भक्ती किशोर दास, वृंदावन धाम पालचे गोपाल चैतन्य महाराज, कन्हैया महाराज, इस्कॉन मंदिरातील नरेंद्र परदेशी, सुरेश शास्त्री मानेकर बाबा, राम मनोहर शास्त्री, प्रवीण महाराज, दुर्गादास महाराज, चिनावल, धनराज महाराज, अंजाळेकर, खासदार रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे, आमदार शिरीष चौधरी, आमदार संजय सावकारे, जि.प.उपाध्यक्ष नंदू महाजन यांच्यासह सर्व नगरसेवक यांची उपस्थिती होती.

