भाजपा सरकारच्या कार्यपद्धत्तीचा निवेदनाद्वारे निषेध


जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागातर्फे प्रांताधिकार्‍यांना निवेदन

भुसावळ : भाजपाच्या ताब्यात नसलेल्या राज्यातील सरकारे पाडण्याचा कुटील डाव केंद्र शासनाकडून सुरू असल्याच्या कार्यपद्धत्तीचा निषेध व्यक्त करीत प्रांताधिकार्‍यांना या संदर्भात नुकतेच जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागातर्फे निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारने काँग्रेस विरोधी निर्णय घेतल्याचा प्रसंगी निषेध नोंदवण्यात आला. जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप भैय्या पाटील यांच्या सुचनेनुसार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे कार्यक्रमाचे समन्वयक योगेंद्रसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे कार्यक्रमाचे समन्वयक योगेंद्रसिंग पाटील, जिल्हा सरचिटणीस रहिम कुरेशी, भुसावळ तालुकाध्यक्ष पंकज पाटील, ईस्माईल गवळी, महेबूब खान, गफुर गवळी, काँग्रेस असंघटीत कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेशभैय्या बारसे, विक्रम वानखेडे, जावेद भाई, काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड.विजय तायडे, विजय तुरकेले, शहराध्यक्ष सुनील जोहरे, उपाध्यक्ष विनोद पवार उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !