गुन्हे दाखल करणे म्हणजे हा तर विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न


यावल शहराध्यक्ष डॉ.निलेश गडे यांचा पत्रकार परीषदेत आरेाप

यावल : दुधाचे दर वाढवण्याच्या मागणीसाठी यावल तालुका भाजपाच्या वतीने शनिवारी येथे करण्यात आलेल्या रास्ता रोकोनंतर आंदोलकाविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले. शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी आंदोलकांवर गुन्हे दाखल करणे म्हणजे राज्य शासनाकडून पक्षपातीपणा करून विरोधकांची गळचेपी होत असल्याचे भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, शहर अध्यक्ष डॉ.निलेश गडे यांनी पत्रकार परीषदेत सांगीतले. गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले तेव्हा त्यांचा वर गुन्हा का दाखल केला नाही तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा वतीने तहसीलमध्ये निवेदन देण्यात आले तेव्हा सुद्धा गुन्हा दाखल केला गेला नाही, भाजपा च्या आंदोलनानंतर उपस्थित कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करणे म्हणजे हा या सरकारचा हा पक्ष पातीपणा असल्याचा आरोप पदाधिकार्‍यांनी केला. भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले म्हणून कार्यकर्ते घाबरणार नसल्याचे सांगून शेतक-यांच्या व जनतेच्या हितासाठी 100 गुन्हे आमच्यावर दाखल झाले तरी आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलने करूच, असेही पत्रकार परीषदेत तालुकाध्यक्ष उमेश फेगडे व शहराध्यक्ष डॉ. गडे यांनी सांगीतले. यावेळी भाजपा शहर सरचिटणीस परेश नाईक, युवा मोर्चा शहराध्यक्ष रीतेश बारी उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !