बोहर्डी शिवारात अनोळखी वयोवृद्धेचा मृतदेह आढळला


वरणगाव : येथून जवळच असलेल्या बोहर्डी शिवारात बुधवारी अनोळखी वयोवृद्धेचा मृतदेह नवीन हायवे ब्रिजच्या खाली आढळला. वरणगाव पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. बोहर्डी शिवारातील नविन हायवे ब्रिजखाली सुमारे 80 वर्षीय वयेवृद्धा मयत अवस्थेत आढळून आला. याबाबत बोहर्डी पोलिस पाटील साहेबराव शांताराम पाटील यांच्या खबरीवरून वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत शरीराने सडपातळ , उंची 5.2 फुट, रंग सावळा, केस कापलेले काळे पांढरे, काळपट, निळसर गाऊण घातलेली, उजव्या हाताच्या पंजावर फुलांची नक्षी व कपाळावर टिकली गोंधलेली तसेच गळ्यात काचेचे मण्याची पोत आहे. ओळख पटत असल्यास वरणगाव पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !