डॉ.प्रदीप साखरे यांची पर्यावरण प्रदूषण मंडळावर राज्य संघटक प्रमुखपदी निवड


भुसावळ : नगरपालिका संचलित म्युन्सीपल हायस्कूलचे क्रीडा शिक्षक, तथा महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरीक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष डॉ.प्रदीप रवींद्र साखरे (सर) यांची महाराष्ट्र राज्य निसर्ग सामाजिक व पर्यावरण प्रदूषण मंडळाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश राज्य प्रमुख संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळाचे राज्याचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी डॉ. प्रदीप साखरे यांची नियुक्ती केली. साखरे यांच्या पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपण कार्याची दखल घेत तसेच त्यांच्या विविध सामाजिक उपक्रमांची दखल तसेच राज्य, राष्ट्रीय पातळीवरील संघटन कार्याच्या कार्यपद्धतीची दखल घेत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होते आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !