कुसुंब्यात भव्य गणपती मंदिर सभागृहाचे भूमिपूजन


स्व.हरीभाऊ जावळे यांच्या निधीतून उभारणी : अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याला यश

रावेर : तालुकयातील कुसुंबा येथे कृषीमित्र स्व.हरीभाऊ जावळे यांच्या निधीतून मंजूर झालेल्या गणपती मंदिर सभागृहाचे भूमिपूजन राम जन्म भूमी शिलान्यासाच्या शुभ दिवसाचे औचित्य साधून प.पू.भरतदासजी महाराज आणि प.पू.विजय महाराज यांच्याहस्ते करण्यात आले.

अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याला यश
कुसुंबा ग्रामस्थांच्या मागणीनुसार तत्कालीन आमदार स्व.हरीभाऊ जावळे यांनी गणपती मंदिराच्या सभागृहाच्या बांधकामासाठी आचारसंहिता लागण्याच्या काही दिवस अगोदरच सात लाखांचा निधी मंजूर करून आणला होता मात्र दुर्दैवाने त्यांचा निवडणुकीत पराभव झाला व सातत्याने निधीसाठी संबंधित अधिकारी आणि विभागाशी पाठपुरावा सुरूच ठेवला होता. त्यातच जुन महिन्यात त्यांचे निधन झाल्याने त्यांचे पुत्र अमोल जावळे यांनी संबंधित विभागाशी पाठपुरावा करीत निधी उपलब्ध करून घेतला. याच माध्यमातून बुधवारी भव्य गणपती मंदिर सभागृहाच्या मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले.

स्व.हरीभाऊ सदैव स्मरणात
स्व.हरीभाऊ आज या जगात नसले तरी त्यांच्या या सद्कार्यामुळे ते कायमच कुसुंबावासीयांच्या स्मरणात राहतील, अश्या प्रतिक्रिया उपस्थित ग्रामवासीयांनी दिल्या. याप्रसंगी कुसुंबा गावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी सरपंच मुबारक तडवी, उपसरपंच सुरेश पाटील, फैजपूरचे माजी नगराध्यक्ष पिंटूभाऊ राणे, गिरीश पाटील, तुषार जावळे, मयुर पाटील, कुणाल कोल्हे, तेजस नारखेडे, तेजस महाजन, ऋषिकेश पाटील, विशाल धनगर आणि समस्त कुसुंबा गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !