भुसावळ तालुका शिवसेनेतर्फे कोरोना योद्ध्यांचा सत्कार
कोरोनाच्या कठीण काळातही जीव धोक्यात घालून सेवा बजावल्याची शिवसेना पदाधिकार्यांकडून दखल
भुसावळ : भुसावळ तालुका शिवसेनेतर्फे कोरोना वैश्विक महामारीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून अखंडपणे मानव जातीची सेवा करीत असलेल्या डॉ.विनोद चौधरी, डॉ.पी.व्ही.पाटील, डॉ.वसीम शेख यांचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भुसावळ तालुका शिवसेनेतर्फे सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. प्रसंगी रेड क्रॉस सोसायटी जळगावचे डॉ.सोनवणे यांच्यासह त्यांच्या संपूर्ण टीमचा देखील रक्तदान शिबिरात सहकार्य केल्याने सत्कार करण्यात आला.
यांचे उपक्रम यशस्वीतेसाठी परीश्रम
या कार्यक्रमाचे आयोजन पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या आदेशाने तसेच जिल्हाप्रमुख प्रमुख तथा मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ तालुका शिवसेनेतर्फे करण्यात आले. यशस्वीतेसाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा संघटक विलास मुळे, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हा संघटक अफसर खान, अल्पसंख्यांक आघाडीचे उपजिल्हा संघटक सईद मुल्लाजी, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक धीरज पाटील, उपतालुकाप्रमुख सुभाष चौधरी, हिरामण पाटील, समाधान पाटील, सुभाष पाटील, उपतालुका संघटक प्रकाश कोळी, ज्येष्ठ शिवसैनिक सुनील कोळी, सुरेश चौधरी, नीळकंठ सरोदे यांच्यासह निलेश सुरडकर, ठाकूर, अतुल पाटील, कैलास पाटील, निखील चौधरी, बाळा गुजर, पंकज पाटील, राहुल बावणे, रोहित मुळे, सागर वंजारी, विपुल बंगाळे, मयूर चौधरी, दीपक पाटील, सागर लोंढे, सागर वाघ, दीपक पाटील, शिवा भोई, गोली भोई, विनोद महाजन, वसंत नेहते सर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी वरणगाव नगरपरीषदेचे मुख्याधिकारी श्याम गोसावी, वरणगावातील गणपती हॉस्पिटलचे डॉ.पी.व्ही.पाटील, डॉ.वसीम शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक मराठे, शहराध्यक्ष संतोष माळी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंकज पाटील, युवक काँग्रेसचे ज्ञानेश्वर पाटील, सुदर्शन जाधव,
राजू पालीमकर, शिवसेनेचे दीपक धांडे, अॅड.लोखंडे, दिव्यांग सेवक देविदास चौधरी, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आकाश कुरकुरे यांची उपस्थिती होती.

