श्री राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी सिंधी समाजातील संतांनाही निमंत्रण
भुसावळ : अयोध्या येथे नुकत्याच पार पडलेल्या श्री राम मंदिर भुमिपूजन समारंभात सिंधी समाजातील संत युध्दष्टरलाल, शदाणी दरबार रायपूर (छत्तीसगड) व स्वामी हंसराज (भिलवाडा, राजस्थान) यांना निमंत्रीत करण्यात आले होते. ही सिंधी समाजासाठी अभिमानाची बाब असल्याचे समाजाचे प्रवक्ता दीपक चांदवाणी यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे. सुमारे 500 वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते अयोध्या येथे प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे भूमिपूजन देशभरातील मोजक्याच संतांच्या उपस्थितीत पार पडले.

