81 गावे सिंचनाखाली आणणार : आमदार चंद्रकांत पाटील


निमखेडी येथे वृक्षदिंडी, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन उपक्रमप्रसंगी दिली ग्वाही

मुक्ताईनगर : नैसर्गिकदृष्ट्या तापी आणि पूर्णा या दोन नद्यांच्या विस्तीर्ण जलाशयामुळे मुक्ताईनगर तालुका हा यापूर्वीच सुजलाम सुफलाम झाला नसले तरी तालुक्यातील 81 गावे सिंचनाखाली आणण्याचा आपला प्रयत्न राहील, अशी ग्वाही आमदार चंद्रकांत यांनी दिली. तालुक्यातील निमखेडी बुद्रुक येथे ओम म्हसोबा बहुउद्देशीय शैक्षणिक संस्थेतर्फे जिल्हा परीषद शाळेत आयोजित वृक्ष दिंडी, वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाच्या उपक्रमप्रसंगी ते बोलत होते.

व्यायामशाळा बांधणार : आमदार पाटील
निमखेडी बुद्रुक येथील ग्रामपंचायत भाजपाची असली म्हणून निधी मिळणार नाही, असे होणार नाही, असे सांगत निमखेडी गावासाठी 55 लक्ष रुपयांची कामे मंजूर केली असून त्यामध्ये 20 लक्ष रुपये स्मशानभूमी व उर्वरीत 30 लक्ष रुपयांमध्ये शहरातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करणे गटारींची व्यवस्था करणे यासारखी कामे करण्यात येतील. मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यातील जिल्हा परीषद शाळांसाठी एकूण 45 वॉल कंपाउंडची मंजुरी देखील मिळाली आहे तसेच निमखेडी बुद्रुक गावासाठी व्यायामशाळा देखील लवकरच मंजूर करून देऊ, असे आश्‍वासन देत पिंपळ, वड ऑक्सिजन देणार्‍या झाडांची लागवड करावी आणि वृक्ष संवर्धन करावे, असे आवाहन त्यांनी या प्रसंगी युवकांना केले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
अध्यक्षस्थानी सरपंच प्रतिनिधी म्हणून हिरालाल कांडेलकर होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्ञानदेव मंडळाचे अध्यक्ष एस.ए.भोई, शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख गोपाळ सोनवणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी, माजी सरपंच नामदेव कांडेलकर, नामदेव भोई, प्रभुदास जाधव, महालखेडा सरपंच प्रमोद कोळी, भगवान चोपडे, प्रमोद घाटे, रवींद्र कांडेलकर, किशोर पाटील, बाळू कांडेलकर, शेषराव कांडेलकर, प्रमोद इंगळे, अनिल पाटील, मुख्याध्यापक भटू वाडीले हे उपस्थित होते.

यांचे यशस्वीतेसाठी परीश्रम
प्रास्ताविक शेषराव कांडेलकर तर सूत्रसंचालन सुधीर मांजरे यांनी तर आभार विनायक वाडेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर सुलताने राहुल ठवरे, श्यामकांत रुले, प्रमोद सोनार, विशाल नारखेडे, स्वप्निल चोपडे, महादेव वराडे, हरी पाटील, अमोल कांडेलकर, महादेव भोंगर, वैभव तायडे, निखील चोपडे, योगेश खांजोडे, वैभव भंगाळे, सुबोध इंगळे, संदीप संभारे, राहुल इंगळे, शंकर तायडे, अरुण सोनवणे, संतोष पाटील, स्वप्नील चोपडे, मुकेश कांडेलकर या माजी विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !