सावतर निंभोर्‍याच्या युवकाचा तापी पात्रात बुडाल्याने मृत्यू


भुसावळ : तालुक्यातील तापी नदी काठी असलेल्या सावतर निंभोरा येथील युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. गणेश ज्ञानेश्वर सपकाळे (30) असे मयत युवकाचे नाव आहे. सपकाळे हा युवक तापी नदीवर पोहण्यासाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मयत झाला. वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, एक मुलगी असा परीवार आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !